छत्रपती संभाजीनगर

शेतकऱ्यांच्या दुधावर चौकशीची ‘चाळण’; मग चौकात पिशवीत बनावट दूध विकणाऱ्यांकडे कानाडोळा का?

CD
पान ४ लीड ----- गोठा नाही, जनावरे नाहीत, तरीही हजारो लिटर दुधाचा महापूर चौकात युरियामिश्रित ‘पांढऱ्या विषा’चा खुला बाजार; शेतकऱ्यांच्या मानगुटीवर अटींची तलवार सकाळ वृत्तसेवा बीड, ता. ५ ः आम्ही रात्रंदिवस शेतात राबून, जनावरांची सेवा करून अस्सल दूध काढतो. पण आमच्या दुधाला योग्य भाव मिळताना नाकी नऊ येतात. दुसरीकडे, शहरातल्या चौकाचौकांत पांढऱ्या पिशवीत केमिकलचे पांढरे पाणी विकून भामटे गब्बर होत आहेत. एफडीएच्या अधिकाऱ्यांना शेतातल्या गरिबांचे दूध तपासताना शूरपणा आठवतो, मग शहरात उघड्यावर चालणारा हा बनावट दुधाचा धंदा त्यांना का दिसत नाही? बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या या संतप्त आणि हतबल प्रश्नांतून प्रशासनाच्या पक्षपाती कारभाराचे भीषण वास्तव समोर आले आहे. एकीकडे प्रामाणिकपणे दूध उत्पादित करणाऱ्या बीड जिल्ह्यातील गोरगरीब शेतकऱ्यांवर तब्बल १८ जाचक अटी आणि तपासण्यांची सक्ती केली जात आहे. शेतकऱ्यांनी दुधात भेसळ केली का, स्वच्छतेचे निकष पाळले का, साठवणूक कशी केली, अशा अनेक तांत्रिक प्रश्नांचा भडीमार करत अधिकारी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मागे हात धुऊन लागले आहेत. मात्र, दुसरीकडे बीड शहराच्या मुख्य चौकांमध्ये दररोज उघडपणे ‘शुद्ध दूध’ म्हणून रसायनयुक्त पांढरे पाणी विकणाऱ्या मोठ्या रॅकेटकडे याच अधिकाऱ्यांनी सोयीस्करपणे डोळेझाक केली आहे. प्रशासनाच्या या संशयास्पद भूमिकेमुळे आणि मूक संमतीमुळे सामान्य नागरिकांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ सुरू आहे. बीड शहराच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक, साठे चौक, ऐतिहासिक कारंजा रोड, नगर नाका आणि इतर गजबजलेल्या भागांत रोज सायंकाळी ५ नंतर हा काळा बाजार खुलेआम भरतो. काही संशयास्पद व्यक्ती कोणत्याही ब्रँड किंवा माहिती नसलेल्या पांढऱ्या पारदर्शक पिशव्यांमधून हे दूध १०० टक्के गाय-म्हशीचे असल्याचा दावा करत विकतात. आश्चर्याची आणि तितकीच धक्कादायक बाब म्हणजे, बीड शहरात किंवा लगतच्या परिसरात असा एकही मोठा तबेला नाही, जिथून दररोज हजारो लिटर दूध उत्पादित होऊ शकेल. चौकात पाकिटांत दूध विकणारे हे चेहरे कधीही शेतकरी वाटत नाहीत आणि त्यांचा शेतीशी दूरपर्यंत संबंध नाही. मग या लोकांकडे रोज सायंकाळी अचानक एवढे शेकडो लिटर दूध येते कुठून, हा मुख्य प्रश्न आहे. अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी याच मुख्य रस्त्यांवरून दररोज शासकीय वाहनांतून ये-जा करतात. तरीही रस्त्याच्या कडेला बिनधास्तपणे चालणारा हा बनावट दुधाचा धंदा त्यांच्या नजरेस न पडणे, हे नागरिकांसाठी आश्चर्य आहे. या पांढऱ्या पिशव्यांच्या आड मोठा आर्थिक मलिदा आणि हप्तेबाजी दडलेली आहे का, असा जळजळीत सवाल आता संतप्त बीडकर विचारत आहेत. दुष्काळामुळे वाढलेले चाऱ्याचे भाव आणि दुधाचा न परवडणारा उत्पादन खर्च यामुळे शेतकरी आधीच मेटाकुटीला आला आहे, त्यात या बनावट दुधामुळे अस्सल दूध उत्पादकांचा पुरता बाजार उठला आहे. ------ पांढऱ्या पिशवीतील रसायनांचे विष शहरातील सुजाण नागरिक आणि दूध तज्ज्ञांच्या मते, हे कुठलेही नैसर्गिक दूध नसून दुधाची पावडर, युरिया (खत), डिटर्जंट, रिफाइंड तेल आणि विविध धोकादायक रसायनांच्या मिश्रणातून तयार केलेले कृत्रिम (सिंथेटिक) दूध आहे. अवघ्या ५ ते १० मिनिटांत तयार होणारे हे घातक रसायनयुक्त दूध लहान मुले, आजारी व्यक्ती आणि वृद्धांच्या शरीरात हळूहळू विष पेरण्याचे काम करत आहे. ग्राहकांना हे दूध स्वस्त मिळत असल्याने ते नकळतपणे आजारांना निमंत्रण देत आहेत. ------ नमुने घ्या, रॅकेट उघडे पाडा! केवळ कागदी घोडे नाचवण्यासाठी शेतकऱ्यांची तपासणी करण्याचे नाटक बंद करून, अन्न व औषध प्रशासनाने तातडीने साठे चौक, शिवाजी महाराज चौक आणि नगर नाक्यावर अचानक धाडी टाकाव्यात. गाड्या लावून या दुधाची जागेवरच चाचणी केली, तर पहिल्याच दिवशी या रॅकेटचा बुरखा फाटल्याशिवाय राहणार नाही. या पिशव्यांमधील दुधाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवून या रॅकेटचा पर्दाफाश करावा, अशी मागणी बीडमधील ग्राहकांमधून होत आहे. ----- विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करणार या वाढत्या रोषानंतर अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचे संकेत दिले आहेत. बीडचे सहायक आयुक्त नितीन मोहिते यांनी स्पष्ट केले आहे की, सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य आमच्यासाठी सर्वोच्च प्राधान्यावर आहे. शहरात किंवा चौकाचौकांत उघड्यावर, पांढऱ्या पिशव्यांमधून होणाऱ्या दुधाच्या विक्रीची तातडीने दखल घेतली जाईल. छत्रपती शिवाजी महाराज चौक, साठे चौक व नगर नाका परिसरात विशेष मोहीम राबवून या दुधाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जातील. भेसळ सिद्ध झाल्यास कोणाचीही गय न करता कायद्यानुसार अत्यंत कठोर कारवाई केली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : ज्ञानेश कुमार यांना तूर्तास दिलासा मात्र विरोधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालय गंभीर; केंद्रासह निवडणूक आयोगाला नोटीस

भन्नाट... भुवनेश्वर कुमार भारतीय संघात परतला; कृणाल पांड्या, नितीश राणा यांनाही संधी, जाणून घ्या केव्हा व कुठे होणार स्पर्धा...

'आई कुठे काय करते' मालिकेतून अचानक काढून टाकलं; लोकप्रिय लेखिकेचा मोठा खुलासा; मला काही येत नव्हतं असं...

Latest Marathi News Live Update : मुख्य निवडणूक आयुक्तांना निलंबित करण्याच्या याचिकेवर अंतरिम आदेशास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

Satara Crime News: साताऱ्यात धक्कादायक घटना! मोबाईल आणि टीव्हीवरून वाद, बॅटचा फटका अन् १७ वर्षीय मुलीचा मृत्यू; बापाचा राग अनावर अन्..

SCROLL FOR NEXT