छत्रपती संभाजीनगर

बेलकुंड उपसा योजनेसाठी पाणी राखीव

CD
औसा : बेलकुंड येथील तलावाचा परिसर. बेलकुंड उपसा योजनेसाठी पाणी राखीव .... निम्न तेरणा प्रकल्पातून मिळणार ११.८० दशलक्ष घनमीटर जलसाठा आमदार अभिमन्यू पवार यांचा पुढाकार परिसरातील १३ ते १४ गावांना मिळणार लाभ दोन हजार ८०० हेक्टर शेतीला होणार फायदा सुधारित प्रशासकीय मान्यता, निविदा प्रक्रियेकडे लक्ष जलील पठाण औसा, ता. ३० : निम्न तेरणा प्रकल्पातून बेलकुंड उपसा जलसिंचन योजनेसाठी ११.८० दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित करण्यासह प्रकल्पाच्या फेरजलनियोजनाला महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे बेलकुंडसह परिसरातील १३ ते १४ गावांमधील सुमारे २ हजार ८०० हेक्टर शेती सिंचनाखाली आणण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. आमदार अभिमन्यू पवार यांनी गेल्या १३ ते १४ महिन्यांपासून केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, जलसंपदा विभागाने २८ ऑक्टोबर २०२६ रोजी यासंदर्भात शासन निर्णय जारी केला. निम्न तेरणा प्रकल्पाच्या जलाशयातून बेलकुंड उपसा जलसिंचन योजना राबविण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २२ ऑगस्ट २०२५ रोजी विशेष बाब म्हणून मान्यता दिली होती. मात्र, या योजनेसाठी पाणी आरक्षित करताना प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या अन्य सिंचन आणि पाणीपुरवठा योजनांच्या पाणीवाटपावर परिणाम होऊ नये, यासाठी फेरजलनियोजन करणे आवश्यक होते. त्यासाठी आमदार पवार यांनी जलसंपदा विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. आता या फेरजलनियोजनाला मंजुरी मिळाल्याने योजनेच्या पुढील प्रशासकीय प्रक्रियेला गती मिळण्याची अपेक्षा आहे. निम्न तेरणा प्रकल्पाच्या डाव्या कालव्याची लांबी ८० किलोमीटर, तर उजव्या कालव्याची लांबी ७४ किलोमीटर आहे. या दोन्ही कालव्यांद्वारे ११ हजार ६१० हेक्टर क्षेत्राला प्रवाही पद्धतीने सिंचनाचा लाभ मिळतो. याशिवाय तेरणा नदीवरील नऊ बॅरेजेसमधूनही सिंचनासाठी पाणी उपलब्ध होते. कालव्यांच्या लाभक्षेत्रातील २ हजार ७८८ हेक्टर क्षेत्र बॅरेजच्या लाभक्षेत्राशी आच्छादित होत असल्याने ११.८० दशलक्ष घनमीटर पाण्याची बचत होत होती. या बचतीतूनच बेलकुंड उपसा जलसिंचन योजनेसाठी पाणी आरक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यमान योजनांच्या पाणीवाटपात बाधा न आणता नव्या योजनेसाठी पाणी उपलब्ध होणार आहे. १९९३ च्या भूकंपानंतर पुनर्वसित झालेल्या बेलकुंड परिसरातील हिप्परगा, तावशी ताड, वांगजी, कवळी, माळकोंडजी, माळुंद्रा आणि देवताळा या गावांसह परिसरातील अन्य गावांमध्ये सिंचनाच्या पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीत. निम्न तेरणा जलाशय जवळ असूनही भौगोलिक उंचीमुळे या गावांना प्रवाही पद्धतीने पाणी मिळणे शक्य होत नाही. परिणामी, शेती मोठ्या प्रमाणावर पावसावर अवलंबून आहे. आता निम्न तेरणामधून विशेष जलवाहिनीद्वारे हे पाणी या योजनेसाठी आणले जाईल. परिणामी या भागातील सुमारे २ हजार ८०० हेक्टर क्षेत्राला सिंचनाची सुविधा उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांसाठी संरक्षित पाणी मिळण्यास मदत होईल. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळानेही या योजनेचा निम्न तेरणा प्रकल्पात समावेश करण्यास मान्यता दिली आहे. शासन निर्णयानुसार लाभक्षेत्र अधिसूचित अथवा निरधिसूचित करण्याची आवश्यकता तपासून पुढील कार्यवाही करावी लागणार आहे. त्यानंतर योजनेचा समावेश करून सुधारित प्रशासकीय मान्यता मिळविणे, निविदा प्रक्रिया पूर्ण करणे आणि प्रत्यक्ष काम सुरू करणे हे महत्त्वाचे टप्पे असतील. कोट---- बेलकुंड व परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा मिळावी, ही अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेला विशेष बाब म्हणून मान्यता दिल्यानंतर पाणी आरक्षणासाठी सातत्याने पाठपुरावा केला. आता फेरजलनियोजनास मंजुरी मिळाल्याने महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. उर्वरित प्रशासकीय प्रक्रिया लवकर पूर्ण करून प्रत्यक्ष काम सुरू व्हावे, यासाठी प्रयत्न सुरूच ठेवणार आहे. या योजनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल -अभिमन्यू पवार,आमदार, औसा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Helicopter Crash: धक्कादायक! बद्रीनाथहून परतणारे हेलिकॉप्टर कोसळले; पायलटसह ६ जणांचा मृत्यू

अर्शदीप सिंगचा वर्ल्ड रेकॉर्ड! IND vs NZ 4th T20I मध्ये फिलिप्सनेही नोंदवले एकापेक्षा एक सरस विक्रम

WhatsApp मध्ये मोठा बदल! आता प्रोफाइलला लावता येणार Cover Photo; मिळणार Facebook सारखा लूक

Marathi News Live Updates : बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट; ३ नोव्हेंबरला मिळणार बोनस

'ये सिर्फ कपड़ा नहीं, अभिमान है'; श्रद्धा कपूरच्या 'ईठा'चा ट्रेलर प्रदर्शित, विठाबाईंच्या भूमिकेतील लूक पाहून चाहते थक्क!

SCROLL FOR NEXT