छत्रपती संभाजीनगर

भडकलगेट ते लेबर कॉलनी अतिक्रमणांवर आज हतोडा?

CD
भडकलगेट ते लेबर कॉलनी अतिक्रमणांवर आज हातोडा? ------- छत्रपती संभाजीनगर, ता. २५ : शहरातील रोशनगेट ते चंपा चौक रस्त्यावर अतिक्रमण हटविल्यानंतर आता भडकलगेट ते लेबर कॉलनी परिसरातील अतिक्रमणांवर महापालिका कारवाई करणार आहे. सोमवारी (ता. २६) ही मोहीम सुरू होण्याची शक्यता आहे. यासाठी महापालिकेने संबंधित भागात आधीच भोंगा फिरवून मालमत्ताधारकांना अतिक्रमणे स्वतःहून काढून घेण्याचे आवाहन केले होते. महापालिकेने मागील आठवड्यात १७ ऑक्टोबरला रोशनगेट ते चंपा चौकापर्यंत अतिक्रमण हटाव मोहीम राबवली होती. या कारवाईत ४६० मालमत्तांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानंतर दंडात्मक कारवाईचा इशारा देत महापालिकेने दगडी महाल ते कटकट गेट आणि चंपा चौक ते जिन्सी मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणांकडे मोर्चा वळविला होता. आता भडकलगेट ते लेबर कॉलनीपर्यंत काही मालमत्ताधारकांनी पदपथापर्यंत अतिक्रमणे केली आहेत. या भागात फळविक्रेते मोठ्या प्रमाणात बसत असल्याने नागरिकांना रस्त्यावरून वाहने चालवून खरेदी करावी लागते. परिणामी, वाहतुकीची कोंडी होऊन अपघाताचा धोका वाढतो. यापूर्वी महापालिकेने काही ठिकाणी कारवाई केली असली, तरी अतिक्रमणांचा प्रश्न कायम असल्याने सोमवारची ही कारवाई महत्त्वाची ठरणार असल्याचे बोलले जात आहे. ---- यापूर्वी बंदोबस्ताअभावी फसली कारवाई या परिसरातील अतिक्रमणे हटवण्यासाठी महापालिकेने यापूर्वीही प्रयत्न केले. मात्र, वेळेत पोलिस बंदोबस्त उपलब्ध न झाल्याने कारवाईला मर्यादा आल्या. आता सोमवारी कारवाई करण्याचे जाहीर केले आहे. या मोहिमेत रस्ते आणि फुटपाथ मोकळे करण्यावर भर दिला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''वृक्षतोडीबाबत ‘फेक नॅरेटिव्ह’ पसवण्याचा प्रयत्न'', CM फडणवीसांनी सांगितलं कर्जतमधील टोरेंट प्रकल्पाचं महत्त्वं, काय म्हणाले?

'मला साडीत बघून माझ्या सासूने ओळखलंच नाही'; सचिन पिळगांवकरांनी माधुरी दीक्षितला सांगितला 'अशी ही बनवाबनवी'चा किस्सा, म्हणाले...

Beed FDA Action: दिवाळीपूर्वी बीडमध्ये FDA चे छापे; पाबळे नमकीन आणि मामा काठियावाडीचे परवाने निलंबित

‘एका तासात इस्रायलला राहण्यायोग्य ठेवणार नाही’; इराणचा नेतान्याहूंना थेट इशारा, थेट नकाशाच शेअर केला...

Pune MPSC News: एमपीएससी चौकशी आयोगाची अद्याप एकही बैठक नाही; उर्वरित ४५ दिवसांत तपास कसा पूर्ण होणार?

SCROLL FOR NEXT