छत्रपती संभाजीनगर

कंडारीतील भैरवनाथ मंदिरातून देवाचा मुकूट चोरला

CD
भैरवनाथ मंदिरातून देवाचा मुकुट चोरला धाराशिव, ता. ४ : परंडा तालुक्यातील कंडारी येथील प्रसिद्ध श्री भैरवनाथ मंदिराच्या गाभाऱ्याचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी मंदिरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह देवाचा पितळी मुकुट चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आंबी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंडारी येथील श्री भैरवनाथ मंदिरात ३० सप्टेंबरच्या रात्री १० वाजता ते १ ऑक्टोबरच्या पहाटे पाचच्या दरम्यान ही चोरीची घटना घडली. चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेत मंदिराच्या गाभाऱ्याचे कुलूप व कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी देवाला परिधान केलेले सुमारे ६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीचा हार आणि देवाचा पितळी मुकुट असा एकूण ८१ हजार १०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून पोबारा केला. पहाटेच्या वेळी मंदिराचे पुजारी तथा सेवाधारी विलास जगन्नाथ क्षीरसागर (वय ६० वर्षे, रा. कंडारी, ता. परंडा) हे मंदिरात आले असता, गाभाऱ्याचा दरवाजा तुटलेला दिसला. आत जाऊन पाहिले असता देवाचे दागिने व मुकुट गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ या घटनेची माहिती ग्रामस्थ व पोलिसांना दिली. या प्रकरणी पुजारी विलास क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरून आंबी पोलिस ठाण्यात शनिवारी (ता. ३) गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जेन्सेन हुआंग यांच्या कमबॅकमुळे अमेरिकी शेअर बाजारात जल्लोश; Nvidiaच्या शेअर्सची मोठी उसळी

Valhe Accident : चिमुकल्यांसमोरच वडिलांवर काळाचा घाला! वाल्हे येथे दुचाकी व चारचाकीचा अपघात; महिला गंभीर जखमी

Relief Hospital Case : रिलीफ रुग्णालय राडा प्रकरणात निलंबित शिवसेना जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाकडून फेटाळण्यात आला

Jejuri Accident : चुकीच्या ओव्हरटेकमुळे दोघांचा बळी; जेजुरीतील माऊलीनगर येथे बसची दुचाकीला धडक, पती-पत्नीचा मृत्यू

Aizawl No Honking Traffic Discipline : ३ तास ट्रॅफिक जाम, तरीही एकाही गाडीचा हॉर्न नाही! मिझोरामच्या 'या' शहरातील शिस्त पाहून आनंद महिंद्राही थक्क; म्हणाले, "देशाने धडा घ्यावा..."

SCROLL FOR NEXT