bharari pathak included health department in 10th and 12th standard examination  sakal
छत्रपती संभाजीनगर

यंदा दहावी-बारावीच्या परीक्षा भरारी पथकात आरोग्य विभागाचा समावेश

कोरोनाच्या अनुषंगाने या भरारी पथकात आरोग्य विभागाचा देखील समावेश करण्यात आला

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : दहावी-बारावीच्या परीक्षा केंद्रावरील गैरप्रकार टाळण्यासाठी व परीक्षा केंद्राना भेटी देवून पहाणीसाठी शासनाच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती (भरारी पथक) स्थापन केली जाते. यामद्ये पोलिस आयुक्तालय, जिल्हा परीषद, शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश असतो. यंदा कोरोनाच्या अनुषंगाने या भरारी पथकात आरोग्य विभागाचा देखील समावेश करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दहावी, बारावी परीक्षा औरंगाबाद विभागातील बीड, जालना, औरंगाबाद, परभणी आणि हिंगोली या पाचही जिल्ह्यामंध्ये चार मार्च ते चार एप्रिल या कालावधीत घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रांवरील गैरप्रकार टाळण्यासाठी, परीक्षा सुरळीत संचलनाकरिता तसेच परीक्षा केंद्रांना भेटी देवून पहाणी करण्याकरीता पोलिस आयुक्त किंवा त्यांचा प्रतिनिधी (आयुक्तालय असलेल्या जिल्ह्यासाठी)

पोलिस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, (जिल्हा परीषद), शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक), जिल्हा शिक्षणाधिकारी (निरंतर शिक्षण), जिल्हा परीषद (सदस्य, सचिव) यांचा समावेश असतो. मात्र, यंदा कोरोनाच्या अनुषंगाने दहावी-बारावी परीक्षेच्या कालावधीत जिल्हा दक्षता समितीमध्ये जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका स्तरावरील आरोग्य अधिकारी यांचा समावेश करण्यात येणार आहे. प्रत्येक परीक्षा केंद्र, उपकेंद्रासाठी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे आवश्यक ते सहकार्य मिळावे, यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे फिरते पथक ठेवण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

स्वतःला देशभक्त म्हणवता? मग यातील कोणकोणते चित्रपट तुम्ही पाहिलेत?

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

SCROLL FOR NEXT