Rahul Gandhi  Sakal
छत्रपती संभाजीनगर

Bharat Jodo Yatra : ‘भारत जोडो यात्रा’ तीन दिवस कळमनुरी तालुक्यात मुक्कामी

राहुल गांधी घेणार सातव कुटुंबीयांची भेट

राजेश नागरे

कळमनुरी : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली ‘भारत जोडो यात्रा’ ११ नोव्हेंबरला तालुक्यात दाखल होत असून ती तीन दिवस असेल. राहुल गांधी यांचा येथे दोन दिवस मुक्काम असेल. या मुक्कामादरम्यान ते ॲड. राजीव सातव यांच्या समाधिस्थळाला भेट देणार असून त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले.

हिवरा पाटी इथून एकरा नोव्हेंबरला ही यात्रा तालुक्यात प्रवेश करील. सायंकाळी साडेपाचला वारंगा फाटा येथे राहुल गांधी यांची कोपरा सभा होईल. १२ नोव्हेंबरला सायंकाळी साडेपाचला यात्रा शहरात दाखल होणार आहे. जिल्हा परिषद हायस्कूलच्या मैदानावर राहुल गांधी यांची सभा होणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. या दिवशी यात्रेचा येथे मुक्काम असेल. १३ नोव्हेंबरलाही यात्रेचा येते मुक्काम असेल.

हा दिवस राहुल गांधी यांनी राखीव ठेवला आहे, असे सांगण्यात आले. या दिवशी ते आपले तत्कालीन सहकारी ॲड. राजीव सातव यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. तसे नियोजन करण्यात आले आहे. यात्रा सुरू झाल्यापासून एखाद्या तालुक्यात तीन दिवसांचा मुक्काम ही पहिलीच वेळ असल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT