छत्रपती संभाजीनगर

महापालिकेला विशेष अनुदान देण्याची भीमआर्मीची मागणी

CD
मनपाला विशेष अनुदान देण्याची भीम आर्मीची सरकारकडे मागणी सकाळ वृत्तसेवा परभणी, ता.४ ः शहर महापालिकेच्या सफाई व कामाठी कर्मचाऱ्यांचे मागील ४ ते ५ महिन्यांचे वेतन थकीत राहिल्याने कर्मचारी व त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची भीषण वेळ ओढवली आहे. मागील २५ दिवसापासून हे कर्मचारी आंदोलन करीत असून त्यामुळे महापालिकेला विशेष अनुदान देण्याची मागणी भीम आर्मीने केली आहे. याप्रकरणी भीम आर्मीने जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाचा नगर विकास विभाग, राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रार नोंदवली आहे. मनपा कर्मचाऱ्यांना हक्काचे वेतन न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांचे दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. कर्मचाऱ्यांच्या घरातील चूल पेटवणे कठीण झाले असून, वृद्ध माता-पित्यांचे आवश्यक औषधोपचार पूर्णपणे बंद पडले आहेत. शाळा-महाविद्यालयांचे शुल्क भरता न आल्यामुळे शेकडो होतकरू विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्ध्यावर सुटण्याची भीती निर्माण झाली आहे. प्रदीर्घ २५ दिवसांच्या उपोषणामुळे आंदोलक कर्मचाऱ्यांची प्रकृती कमालीची खालावली आहे. दुसरीकडे, सलग काम बंद आंदोलनामुळे परभणी शहरातील सार्वजनिक स्वच्छता यंत्रणा पूर्णपणे कोलमडली असून शहरात आरोग्याची आणीबाणी व कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे विशेष आपत्कालीन वेतन अनुदान मंजूर करून मनपाच्या बँक खात्यात वर्ग करावे, नियमित वेतन मिळण्यासाठी शासनाने स्वतंत्र व कायमस्वरूपी अनुदान चक्र निर्धारित करावे, सुरक्षा, आरोग्य विमा व कायदेशीर सोयी सुविधा पुरवण्यासाठी अतिरिक्त निधीस मंजुरी द्यावी, अशी मागणी भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर बनसोडे यांनी केली आहे. -----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१४ चौकार, ७ षटकार अन् शतक... Smriti Mandhana चे दोन वर्ल्ड रेकॉर्ड! अशी कामगिरी करणारी बनली जगातील नंबर १ फलंदाज

Baramati News: डोर्लेवाडीत सभागृह, मंदिराच्या जागेवरून दोन गट आमनेसामने; तणावामुळे मोठा पोलिस बंदोबस्त

'ड्रायव्हर काकांनी मला त्रास दिला...' ३ वर्षीय चिमुकलीची आजीकडे तक्रार; नवी मुंबईत काय घडलं?

Marathi News Live Updates : पुणे, नागपूरनंतर संभाजीनगरमध्येही गणेशोत्सवात डीजेला बंदी; नियम मोडल्यास कडक कारवाई

Kabnur Ichalkaranji Road Accident : रस्त्यातील खड्डा बनला काळ! कबनूर-इचलकरंजी मार्गावर दुचाकी-कारची भीषण धडक, दहावीचे 2 विद्यार्थी गंभीर

SCROLL FOR NEXT