छत्रपती संभाजीनगर

भोकरदन पालिकेत अंतर्गत राजकारण पेटले! विकासकामांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह; नगराध्यक्षांचा ‘प्रतिमा मलीन’ करण्याचा आरोप

CD
भोकरदन पालिकेत अंतर्गत राजकारण पेटले! भोकरदन, ता. १६ (बातमीदार) : येथील नगर परिषदेच्या विकासकामांच्या दर्जावरून नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असतानाच, सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील अंतर्गत मतभेदही समोर आले आहेत. पक्षाचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक नईम कादरी यांनी थेट नगर परिषद प्रशासनाकडे विकासकामांचा लेखाजोखा मागितला आहे. त्यामुळे पालिकेतील कारभारावर सत्ताधाऱ्यांनी प्रश्न उपस्थित केल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांच्या दर्जाबाबत नागरिकांकडून तक्रारी करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर नगरसेवक कादरी यांनी प्रभाग क्रमांक ८ व ९ मधील सन २०२६ मध्ये मंजूर, सुरू असलेल्या आणि पूर्ण झालेल्या कामांची कामनिहाय माहिती मागविली आहे. कामाचे नाव, मंजूर अंदाजित किंमत, निधीचा स्रोत, निविदा प्रक्रिया, ठेकेदाराचे नाव, कार्यादेश, मोजमाप पुस्तिका तसेच नागरिकांच्या तक्रारींवर करण्यात आलेली कारवाई, याबाबतची माहिती त्यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागितली आहे. विकासकामांमध्ये त्रुटी अथवा नियमबाह्य बाबी आढळल्यास त्यावर कोणती कारवाई करण्यात आली, याची माहितीही त्यांनी मागितली आहे. त्यांच्या या मागणीमुळे नगर परिषद प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत सत्ताधारी लोकप्रतिनिधीनेच प्रश्न उपस्थित केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शहरातील विकासकामांच्या दर्जाबाबत सुरू असलेल्या चर्चेला आणखी उधाण आले आहे. दरम्यान, या घडामोडींनंतर सत्ताधारी गोटातही चर्चा सुरू झाली आहे. नगराध्यक्ष समरीन नाज बेग मिर्झा यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना, ‘‘तक्रार करणे हा त्यांचा घटनात्मक अधिकार आहे. त्याला माझा विरोध नाही. मात्र, विकासकामांमध्ये अडथळे निर्माण करून माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात आहे,’’ असा आरोप केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Success Story: सहा वेळा अपयश, तरी जिद्द सोडली नाही! नांदेडचा ओमकेश झाला क्लास वन अधिकारी; आईच्या मांडीवर डोकं ठेवताच अश्रू अनावर

Siddi Community Marathi Song Viral Video : आफ्रिकन लूक अन् अस्सल मराठी गावरान ठसका; माठावर ठेका धरत सिद्दी तरुणांनी गायले ‘हिरो होंडा’ गीत

Nagpur Earthquake Latest Update : नागपूर जिल्ह्यात 2.6 रिश्टर स्केलचा भूकंप! तुमच्या भागात जाणवले का धक्के? किती झाले नुकसान?

Latest Marathi News Live Update: : पार्थ पवारांची शरद पवारांसोबत तब्बल दोन ते अडीच तास महत्त्वपूर्ण बैठक; दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान भेटीने वेधले राजकीय वर्तुळाचे लक्ष

U19 Asia Cup: IND vs PAK सामन्यात ड्रामा! नॉ-बॉलवर भारतीय फलंदाजाला आऊट दिलं? यशवर्धनच्या विकेटवरून वाद

SCROLL FOR NEXT