छत्रपती संभाजीनगर

दुष्काळाच्या झळांनी भूम तालुक्यात रब्बी हंगाम कोलमडला; ज्वारीच्या पेरणीत मोठी घट

CD
BMH26A10163 भूम ः पाथरूड परिसरातील शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली. पण पाण्याअभावी पिके सुकू लागली आहेत. .... शेतात ओलावा नाही, विहिरीत पाणी नाही ज्वारीच्या कोठारातच रब्बी हंगाम संकटात; धान्याबरोबर चाऱ्याचा प्रश्न गंभीर भूम, ता. १८ (बातमीदार) : ज्वारीचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भूम तालुक्यात यंदा दुष्काळाचे सावट अधिक गडद झाले आहे. पावसाने पाठ फिरवल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला असून विहिरी आणि बोअरवेलची पाणीपातळीही घटली आहे. परिणामी रब्बी हंगामातील पेरणीला मोठा फटका बसल्याने तालुक्यात आतापर्यंत केवळ २५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तसेच पेरणी झालेल्या क्षेत्रातील उगवलेली पिकेही पाण्याअभावी करपू लागल्याने शेतकरी चिंतेत आहेत. भूम तालुक्यात दरवर्षी सरासरी २९ हजार ४६८ हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी होते. मात्र, यंदा आतापर्यंत केवळ ७ हजार ५६० हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली आहे. हरभऱ्याची सरासरी पेरणी ११ हजार ९७७ हेक्टर असताना प्रत्यक्षात केवळ १५० हेक्टरवर पेरणी झाली आहे. गव्हाची १ हजार ५०० हेक्टर सरासरी पेरणी असताना अवघ्या ३६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. मक्याचे क्षेत्रही १ हजार ७३७ हेक्टरवरून १२९ हेक्टरपर्यंत मर्यादित राहिले आहे. पावसाची प्रतीक्षा न करता काही शेतकऱ्यांनी जमिनीतील कमी ओलाव्यावरच पेरणी केली. मात्र, त्यानंतर पाऊस न झाल्याने अनेक ठिकाणी बियाण्यांची उगवण झाली नाही. ज्या ठिकाणी पिके उगवली, ती वाढत्या उन्हामुळे आणि पाण्याअभावी सुकू लागली आहेत. विहिरी व बोअरवेलची पाणीपातळी घटल्याने पिकांना पाणी देणेही शक्य होत नाही. ................... ((चौकट)) दुग्धव्यवसायालाही फटका भूम तालुक्यात ज्वारीचे उत्पादन केवळ धान्यासाठीच नव्हे, तर पशुधनासाठी मिळणाऱ्या कडब्यासाठीही महत्त्वाचे आहे. दरवर्षी तालुक्यात मोठ्या प्रमाणात कडबा उपलब्ध होतो. तालुक्यातील जनावरांसाठी पुरेसा चारा मिळण्याबरोबरच अन्य जिल्ह्यांतही कडब्याची विक्री केली जाते. मात्र, यंदा ज्वारीचे क्षेत्र घटल्याने धान्याबरोबरच चाऱ्याचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता आहे. तालुक्यात दूध उत्पादनाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. चारा आणि पाण्याची टंचाई निर्माण झाल्यास दुग्धव्यवसायासह पेढा व खवा तयार करणाऱ्या व्यावसायिकांनाही त्याचा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. .................. ((कोट)) सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहता शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी. तसेच आगामी काळात तालुक्यातील पशुधनासाठी चारा आणि पाण्याची उपलब्धता करून देण्यासाठी आतापासूनच नियोजन करावे. - अमोल भोसले, शेतकरी .................... ((पॉईंटर)) पेरणी आकडेवारीत पीक यंदाची पेरणी (हेक्टर) सरासरी पेरणी (हेक्टर) हरभरा १५० ११,९७७ गहू ३६ १,५०० ज्वारी ७,५६० २९,४६८ मका १२९ १,७३७ इतर ३० ३००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MG Road वरील खाऊ गल्लीत FDA ची धडक कारवाई; परवाना नसलेल्या पाच खाद्यविक्रेत्यांना व्यवसाय बंद करण्याचे आदेश

Yuzvendra Chahal 400 T20 Wickets: युझवेंद्र चहलने इतिहास रचला... ट्वेंटी-२०मध्ये असा पराक्रम करणारा पहिला भारतीय गोलंदाज

Youngest Demat Account Holder : वय अवघे ६ दिवस अन् थेट शेअर बाजारात एन्ट्री! १२ दिवसांचा जुना रेकॉर्ड मोडत दिल्लीच्या चिमुकल्याने रचला नवा विश्वविक्रम

Sudhir Mungantiwar : "आपलं सरकार इंग्रजांपेक्षाही वाईट..."; सुधीर मुनगंटीवार आक्रमक, मुख्यमंत्र्यांसमोरच मांडली भूमिका, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : सोनं-चांदी दरात पुन्हा घसरण; सोनं 2 हजार 800 रुपयांनी तर चांदी चार हजार रुपयांनी घसरली

SCROLL FOR NEXT