छत्रपती संभाजीनगर

बिडवे महाविद्यालयाची राष्ट्रीय पातळीवर छाप आयआयटी मुंबईच्या ‘नॅशनल एन्टरप्रेन्युअरशिप चॅलेंज’मध्ये मिळवले अव्वल स्थान

CD
बिडवे महाविद्यालयाची राष्ट्रीय पातळीवर छाप ----------- लातूर, ता. ८ : एम. एस. बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘इ-सेल’ने (एन्टरप्रेन्युअरशिप सेल- एमएसबीईसीएल) राष्ट्रीय स्तरावर नेत्रदीपक यश संपादन केले आहे. आयआयटी मुंबईच्या वतीने आयोजित ‘नॅशनल एन्टरप्रेन्युअरशिप चॅलेंज’च्या बेसिक ट्रॅकमध्ये बिडवे महाविद्यालयाच्या इ-सेलने देशभरातून ७४ वा राष्ट्रीय रँक पटकावला. या यशामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या राष्ट्रीय स्पर्धेत देशभरातील तब्बल १ हजार १०० नामांकित महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. या अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत बिडवे महाविद्यालयाच्या संघाने उत्तम कामगिरी करत एकूण १ हजार ७९० गुण मिळवले आणि राष्ट्रीय स्तरावर अव्वल १०० मध्ये स्थान मिळवले. ‘एन्टरप्रेन्युअरशिप सेल’ (इ-सेल) हा विद्यार्थ्यांद्वारे चालवला जाणारा एक उपक्रम आहे, ज्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नवसंशोधन, उद्योजकता, नेतृत्वगुण आणि सर्जनशील विचारांना चालना दिली जाते. तर ‘नॅशनल एन्टरप्रेन्युअरशिप चॅलेंज’ हे महाविद्यालयीन स्तरावर उद्योजकतेचे वातावरण अधिक मजबूत करण्यासाठी विविध प्रात्यक्षिके, उपक्रम आणि आव्हानांच्या माध्यमातून राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देते. महाविद्यालयाच्या इ-सेलमध्ये विजय चक्रे, नंदिनी येरंडे, श्रेयश बोचरे, जुनैद पटेल, समीक्षा मद्रेवार, प्रसाद बोके, वेदांत पोतदार, धनश्री केंद्रे, राजनंदिनी चव्हाण वैष्णवी पवार यांच्यासह अन्य विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या स्पर्धेमध्ये डॉ. एन. एम. हालगरे यांनी सल्लगार म्हणून काम केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Earthquake Latest Update : नागपूर जिल्ह्यात 2.6 रिश्टर स्केलचा भूकंप! तुमच्या भागात जाणवले का धक्के? किती झाले नुकसान?

U19 Asia Cup: IND vs PAK सामन्यात ड्रामा! नॉ-बॉलवर भारतीय फलंदाजाला आऊट दिलं? यशवर्धनच्या विकेटवरून वाद

Tukaram Munde Midnight Raid and First Posting Revelations : आयुक्त तुकाराम मुंढेंचा खळबळजनक गौप्यस्फोट; २००७ मधील पहिल्याच पोस्टिंगच्या वेळी मध्यरात्रीच्या धाडीचा थरारक किस्सा अन् 'त्या' फोन कॉलबद्दल केला खुलासा

Latest Marathi News Live Update: : पार्थ पवारांची शरद पवारांसोबत तब्बल दोन ते अडीच तास महत्त्वपूर्ण बैठक; दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान भेटीने वेधले राजकीय वर्तुळाचे लक्ष

Pimpri Chinchwad fire brigade : गेल्या वर्षी दिवाळीत आगीच्या ७० घटना; यंदा पिंपरी-चिंचवडमध्ये २० अग्निशमन वाहने सज्ज, २२ संवेदनशील ठिकाणांवर २४ तास लक्ष

SCROLL FOR NEXT