Jayakwadi Dam 
छत्रपती संभाजीनगर

नाशिकहून पाण्याची ‘नाथसागर’कडे झेप

वाढती आवक, सध्या ४१ टक्के साठा

सकाळ वृत्तसेवा

पैठण - नाशिक जिल्ह्यात होत असलेला पाऊस, गोदावरीला आलेल्या पुरामुळे येथील ‘नाथसागर’ च्या (जायकवाडी प्रकल्प) जलपातळीत मोठी वाढ होत आहे. मंगळवारी ५० हजार क्युसेक पाणी दाखल होत होते. नांदुरा-मधमेश्वर बंधाऱ्यातून ८० हजार क्युसेक पाणी नाथसागराच्या दिशेने झेपावले आहे. ते बुधवारी (ता.१३) दुपारपर्यंत दाखल होईल.

सध्या नाथसागराची पाणीपातळी १५०९.०० फूट असून जिवंत पाणीसाठा ९००.०० दशलक्ष घनमीटर आहे. जलसाठ्याची टक्केवारी ४१ आहे. आज रात्री व उद्या सायंकाळपर्यंत एक लाख क्युसेकपर्यंत पाण्याची आवक होण्याची शक्यता जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केली. दरम्यान, नाथसागराच्या वरील भागातील, नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात तब्बल दुपटीने वाढ झाली आहे. पाच-सहा दिवसांपूर्वी या धरणांमध्ये २५ टक्के इतका पाणीसाठा होता. आता तो ७० टक्क्यांवर पोचला आहे. गंगापूर, दारणा, भंडारदरा, निळवंडे, मुळा, काश्यपी, गौतमी, आळंदी, गोदावरी, पालखेड, करंजवण, ओझरखेड, पुणेगाव, दारणा, भावली, मुकणे, वालदेवी, कडवा, चणकापूर, हरणबारी, केळझर टक्के, गिरणा, पुनद या छोट्यामोठ्या धरणांतील साठा ६० टक्के झाला आहे.

जायकवाडी क्षमतेच्या १० टक्के पाणी रवाना

नाशिक : जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधारेमुळे गंगापूर, दारणा धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यासोबत पावसाचे पाणी जायकवाडी धरणाकडे नांदूर-मधमेश्‍वर धरणातून रवाना होत आहे. बुधवारी सकाळपर्यंत जायकवाडी धरणाच्या क्षमतेच्या १० टक्क्यांहून अधिक पाणी रवाना होईल. आज सकाळपर्यंत साडेपाच टीएमसीहून अधिक पाणी गोदावरीमधून जायकवाडीकडे निघाले होते. तसेच आणखी साडेसहा टीएमसी पाणी रवाना झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET 2027: पुढच्या वर्षीच्या नीट परीक्षेत होणार 'हे' बदल! वर्षातून अनेकवेळा परीक्षा होण्याची शक्यता

Pankaja Munde : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा पालकमंत्र्यांसमोर आक्रोश, सरकार शेतकरी-पशु पालकांच्या पाठीशी

CBSE Three Language Policy : सीबीएसईच्या सहावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! त्रि-भाषा धोरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; काय दिले निर्देश?

Alegaon Murum Mining: आळेगाव पागा मुरूम उत्खनन प्रकरण: पंचनाम्यातील आकडे संशयास्पद, पर्यावरणप्रेमींची सखोल चौकशीची मागणी

Pitru Paksha 2026 : पितृपक्षात श्राद्धाचं जेवण कसं असावं? शास्त्रानुसार काय वाढावं आणि काय टाळावं जाणून घ्या

SCROLL FOR NEXT