Sandipan Bhumre Sakal
छत्रपती संभाजीनगर

Sandipan Bhumare : पालकमंत्री होताच भूमरेंचे दोन मोठे दावे; म्हणाले, वर्षभरात...

भूमरेंच्या दाव्यांनंतर अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. तसेच अनेक चर्चांना उधाण आले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Sandipan Bhumare News : अनेक दिवसांपासून पालकमंत्र्यांची घोषणा न झाल्याने विरोधकांनी सरकारला घेरण्याचा अनेकदा प्रयत्न केला होता. अखेर शनिवारी संध्याकाळी शिंदे-फडणवीस सरकारने पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा केली आहे. यामध्ये शिंदे गटातील संदिपान भूमरे यांची औरंगाबादच्या पालकमंत्रीपदी वर्णी लागली आहे. या पदावर वर्णी लागताच भूमरे यांनी दोन मोठे दावे केले असून, त्यांच्या या दाव्यांनंतर अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. तसेच अनेक चर्चांना उधाण आले आहे.

भूमरेंचे दावे काय?

औरंगाबादमध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर असून, यावरून चांगलेच वातावरण तापलेले असून, येत्या वर्षभरात शहराचा पाणीप्रश्न तडीस नेणार असल्याचा दावा भूमरे यांनी केला आहे. पाणी प्रश्नावरून मध्यंतरीच्या काळात मविआ आणि भाजपमध्ये जोरदार आरोपप्रत्यारोप करण्यात येत होते. एवढेच नव्हे तर, खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नावरून औरंगाबाद येथे जलाक्रोश मोर्चा काढला होता. त्यानंतर आता भूमरे यांनीदेखील वर्षभरात शहराला नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा केली आहे.

शिंदेच्या दसरा मेळाव्यापासून सुरू होणार मोठी इन्कमिंग

यावेळी त्यांनी येत्या दसरा मेळाव्यापासून शिंदे गटासात मोठी इन्कमिंग होणार असल्याचा दावादेखील भूमरेंनी केला आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय चर्चांना उधाण आले असून, अनेक पुढारी आणि कार्यकर्ते शिंदे गटात दाखल होणार असल्याचा दावा भूमरे यांनी केला आहे. यावेळी त्यांनी चंद्रकांत खैरे यांच्यावर टीका करत खैरे म्हणजे औरंगाबाद शहराचे भकास पालकमंत्री होते असा टोला लगावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

England Squad vs Pakistan : पाकड्यांचा बँड वाजवण्यासाठी इंग्लंडने जाहीर केला तगडा संघ! २ वर्षानंतर एका खास ऑल राऊंडरला बोलावले... बाबरच्या संघाचे धाबे दणाणले

Abhijit Dipke: जंतरमंतर आंदोलनकर्त्यांना डावलल्याचा आरोप; मनीष ब्रह्मभट यांचा अभिजीत दीपके यांच्या घरासमोर ठिय्या

Marathi News Live Updates : मेटाची जागतिक टीम आणखी काही दिवस भारतात राहणार

Nanded Guru Gobind Singh MoU: गुरु गोबिंदसिंघजींच्या विचारांच्या जागतिक प्रसारासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा व देशभक्त विद्यापीठांचा सामंजस्य करार

Thane Crime: नामांकित बांधकाम व्यावसायिकाला यंत्रणांचा धाक दाखवून ८ कोटींची मागणी, खंडणीप्रकरणी तिघांना अटक

SCROLL FOR NEXT