छत्रपती संभाजीनगर

डोक्यावर ओझे, कडेवर मुलं, पोटात आग अन् पायाची चाळणी 

शेखलाल शेख


औरंगाबाद: कोरोनाचे संकट कामगार, कष्टकरी, मजुरांसाठी भयंकर उपासमार तर घेऊन आलेय. डोक्यावर ओझे, कडेवर मुले, पोटात आग अन् पायाची चाळणी करीत हे कामगार पायपीट करीत आपल्या गावाकडे निघाले आहेत. लॉकडाऊननंतर औरंगाबादच्या वाळूज, शेंद्रा, चितेगाव, चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमधील मध्य प्रदेशातील कामगार जवळपास ४०० ते ५०० किलोमीटर पायीच आपल्या गावाकडे निघाले आहेत.

औरंगाबादच्या औद्योगिक वसाहतीत जवळपास उत्तरप्रदेश, बिहार, मध्य प्रदेश आणि इतर राज्यांतील १५ ते २० हजार कामगार, मजूर आहेत. 
लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून या कामगार, मजुरांच्या हाताला काम नाही. कंपन्यांमध्येसुद्धा उत्पादन बंद असल्याने त्यांना काम मिळणे अवघड झाले. काहीजण बांधकाम कामगार म्हणून काम करतात; मात्र साईटसुद्धा बंद झाल्या आहेत.

जगण्याचा मार्ग अतिशय खडतर झाल्याने या कामगारांनी थेट आपल्या गावाचा रस्ता धरला आहे. रविवारी (ता.२९) अनेक कामगार मध्य प्रदेशकडे पायीच निघाले होते. डोक्यावर जगण्यापुरते सामान तसेच कडेवर लहान मुले घेऊन ही कुटुंबं निघाली आहेत. सोबत खाण्यासाठी तर काहीच नाही. नगरनाक्यावर त्यांना काहीजण मदत करीत अन्नाचे पाकीट देत आहेत; मात्र पुढील रस्ता त्यांच्यासाठी अनेक संकटांचा आहे.

औरंगाबादपासून भोपाळच्या रोडने अंतर हे ५९४ किलोमीटर आहे. इंदूरचे अंतर हे ४०८ किलोमीटर आहे. यामधील अनेक कामगारांना ४०० ते ५०० किलोमीटरचा प्रवास करून आपले गावे गाठावे लागणार आहे. हा प्रवास करताना त्यांची उपासमार होण्याची शक्यता आहे; मात्र रस्त्यात त्यांना अनेक जण अन्नाचे पाकीट देत आहेत.

आमच्या संघटनेतर्फे आम्ही कामगारांसाठी जेवणाची व्यवस्था केली आहे. जेथे कामगार असतील तेथे त्यांना किमान तीन महिन्यांपर्यंत अन्नाची सोय केली जात आहे. तरीही जे कामगार राहण्यास तयार नाहीत अशांची तपासणी करून त्यांना वाहनाने त्यांच्या जिल्ह्यात प्रशासनाने सोडून यायला हवे; तसेच आम्ही प्रत्येक जिल्ह्यात आमच्या संघटनेतर्फे कामगारांना मदत करत आहोत.

- उद्धव भवलकर (नेते, सीटू) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Illegal Gender Test : नाव श्रद्धा पण काम अंधश्रद्धा, उमलणाऱ्या कळा खोडणारा डॉक्टर; एजंट ताब्यात, सोनोग्राफी मशीन, गोळ्या जप्त

Pandharpur Vitthal Online Puja Booking : सावळ्या विठ्ठलाची पूजा करायचीय? 'या' तारखेपासून सुरू होतेय ऑनलाईन नोंदणी; जाणून घ्या सविस्तर नियम!

Latest Marathi News Live Update : शरद पवार आज एक दिवसाच्या नागपूर दौऱ्यावर, काय आहे कारण?

'हा कसला फालतूचा अ‍ॅटिट्यूड' काजोल पापाराझींवर भडकल्याने नेटकरी संतापले, Viral Video

Maharashtra kerosene Supply: राज्य सरकारचा रॉकेल पुरवठ्याचा निर्णय; वितरण करणारी व्यवस्था नामशेष, रॉकेल येणार पण स्टोव्हच सापडेना!

SCROLL FOR NEXT