छत्रपती संभाजीनगर

विभागीय आयुक्तांच्या निर्देशानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाला जाग: बायोमेट्रिक हजेरीसाठी धाराशिव जिल्ह्यातील ६४ कार्यालयप्रमुखांना आदेश:

CD
शासकीय कार्यालयांत बायोमेट्रिक हजेरीचे आदेश विभागीय आयुक्तांकडून तक्रारीची दखल; जिल्हाधिकाऱ्यांकडून कार्यवाहीच्या सूचना कळंब, ता. ११ (बातमीदार) : धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विविध शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती बायोमेट्रिक हजेरी प्रणालीद्वारे नोंदवून, त्यानुसारच मासिक वेतन अदा करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राहुल मुळे यांनी विभागीय आयुक्तांकडे केली होती. याची दखल घेत विभागीय आयुक्त कार्यालयाने जिल्हाधिकाऱ्यांना नियमानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्ह्यातील ६४ विविध शासकीय कार्यालयांच्या प्रमुखांना स्वतंत्र आदेश देऊन तक्रारीच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयास सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या कार्यालयांमध्ये जिल्हा परिषद, जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय, उपविभागीय अधिकारी, तहसील, कृषी, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, महावितरण, पाणीपुरवठा, वन, पशुसंवर्धन, महिला व बालविकास, भूमी अभिलेख, कोषागार, नोंदणी व मुद्रांक, शिक्षण, आरोग्य, उद्योग, कामगार, सामाजिक न्याय, परिवहन, कारागृह, माहिती व जनसंपर्क आदी विभागांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने संबंधित कार्यालयप्रमुखांना केलेल्या कार्यवाहीची माहिती तक्रारदार मुळे यांनाही कळविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे बायोमेट्रिक हजेरीची अंमलबजावणी कितपत प्रभावीपणे होते, याकडे आता लक्ष लागले आहे. ......................... ((कोट)) बायोमेट्रिक हजेरीमुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियमित उपस्थिती सुनिश्चित होण्यास मदत होईल. त्यातून कार्यालयीन शिस्त, प्रशासकीय पारदर्शकता आणि सार्वजनिक निधीतून होणाऱ्या वेतन खर्चावर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल. - राहुल मुळे, सामाजिक कार्यकर्ते, कळंब

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja 2026 First Look: मुंबईच्या राजाचं पहिलं दर्शन आज! लालबागच्या राजाचा LIVE सोहळा कुठे पाहाल?

Pune Fraud News : आजार बरा करण्‍याच्‍या बहाण्‍याने भोंदू महिलेने उकळले ४५ हजार; बिबवेवाडीतील भोंदू मोनाली विधातेविरुद्ध गुन्हा दाखल

PF खात्यातून इमर्जन्सीत पैसे काढायचे आहेत? EPFO ने बदलले नियम, आता मिळतील 'इतके' टक्के पैसे!

Latest Marathi News Live Update : लक्ष्मण हाकेंचा अभिजीत दिपकेंना टोला; म्हणाले, ‘आधी...

Madhuri Elephant Nandani Math : माधुरी हत्ती नांदणी मठातील धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार का? वनताराकडून सूचनांची आली यादी

SCROLL FOR NEXT