Bird flu sakal
छत्रपती संभाजीनगर

ठाण्यात बर्ड फ्लूचा ‘ताप’, जिल्ह्यात दक्षता

पशुसंवर्धन विभाग लागले कामाला, प्रत्येक तालुक्यात दोन पथके स्थापन

सकाळ वृत्तसेवा

जालना : राज्यात गतवर्षी बर्ड फ्लूची साथ आली होती. याचा फटका कुक्कुटपालन करणाऱ्यांना बसला होता. त्यानंतर आता पुन्हा ठाणे जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाला. त्यामुळे खबरदारी म्हणून जालना जिल्ह्यात पशुसंवर्धन विभाग दक्ष झाला. प्रत्येक तालुक्यात दोन पथके स्थापन करण्यात आली आहेत.

जिल्ह्यात कुक्कुटपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो. आजघडीला जिल्ह्यामध्ये सव्वा ते दीड लाख कुक्कुटपालन असलेले दोन मोठे उद्योग आहेत तर छोटे-मोठे १२५ ते १५० कुक्कुटपालन व्यवसाय करणारे आहेत. राज्यात गतवर्षी जानेवारी महिन्यात बर्ड फ्लूची साथ आली होती. यावेळी जिल्ह्यात बर्ड फ्लू आल्याने काही कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे कुक्कुटपालन व्यवसायावर विपरीत परिणाम झाला होता.

गतवर्षी चिकनचे दर खाली आले होते. त्यामुळे कुक्कुटपालन आर्थिक अडचणीत आले होते. अशात आता राज्यात बर्ड फ्लूची साथ आली आहे. ठाणे जिल्ह्यात बर्ड फ्लूमुळे हजारो कोंबड्या मारण्याचा निर्णय घेण्यात आला. अशात जिल्ह्यात ही पशुसंवर्धन विभाग दक्ष झाला आहे. बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमिवर जिल्ह्यात १६ पथकांची स्थापना केली आहे. प्रत्येक पथकामध्ये पशुवैद्यकीय डॉक्टर व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. शिवाय पशुसंवर्धन विभाग दक्ष असून, कोंबड्या आजारी पडल्यास त्यांच्या उपचारासह याची माहिती संकलन करण्याच्या कामाच्या तयारी लागले आहे.

सोमवारी बैठक होण्याची शक्यता

राज्यात बर्ज फ्लूची साथ आल्याने जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाकडून दक्ष आहे. शिवाय सोमवारी (ता.२२) जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड व पशुसंवर्धन विभागाची याबाबत बैठक होण्याची शक्यता आहे.

''जिल्ह्यात अद्याप बर्ड फ्लूची लागण झालेले नाही. परंतु, ठाणे जिल्ह्यात बर्ड फ्लूची साथ आल्याने आम्ही सतर्क झालो. प्रत्येक तालुक्यात दोन पथके स्थापन केलेली आहेत.''

- अमितकुमार दुबे, सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन आयुक्त कार्यालय, जालना.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT