भाजप नगरसेवकांनी
दिले सभेसाठी विषय
सकाळ वृत्तसेवा
परभणी, ता. २८ ः आगामी सर्वसाधारण सभेत आम्ही दिलेले महत्त्वपूर्ण विषय विषयपत्रिकेवर घ्यावेत, अशी मागणी भाजपचे मनपातील गटनेते विश्वजित बुधवंत यांच्यासह नगरसेवकांनी केली आहे.
या प्रकरणी मनपा आयुक्त व महापौरांना निवेदन देण्यात आले. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये दिलेल्या विषयांवर चर्चा होऊन निर्णय होणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. शहरात हॉकर्स झोनच्या संदर्भात ठोस निर्णय घेणे, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार शहरातील किती अतिक्रमण काढले व किती काढणे बाकी आहे, यावर तत्काळ कारवाई का होत नाही यावर चर्चा करणे, दुष्काळाच्या उपाययोजना लागू करणे, समांतर पाणीपुरवठा योजनेची निविदा रद्द करून पुन्हा प्रसिद्ध करणे, ज्या बांधकामांची मोजणी पूर्ण झाली पण घरपट्टी लागू झाली नाही, त्यांना लागलीच घरपट्टी लागू करणे व अनधिकृत नळजोडणीधारकांसाठी अभय योजना लागू करणे, जन्म-मृत्यू विभागातील सावळा गोंधळ व हा विभाग तीनही प्रभाग समित्यांमध्ये सुरू करणे, कर्मचाऱ्यांच्या थकीत जीएसटी अनुदानासाठी समिती गठीत करणे व शासन स्तरावर निरंतर पाठपुरावा करावा, बांधकाम परवान्यातील सावळ गोंधळ, अनधिकृत होर्डिंग व टॉवरबाबत वसुली व ठोस निर्णय घेणे, नगरसेवकांच्या पत्राला केराची टोपली दाखवणाऱ्या अधिकाऱ्यावर कार्यवाही करणे, मनमानी कारभार करणाऱ्या सर्वच अधिकाऱ्यांवर कार्यवाही करून त्यांचे अधिकार कमी करणे, एकाच ठिकाणी ठाण मांडून बसणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करणे, एक अधिकारी एकच जिम्मेदारी देणे, महसूल वाढीबाबत सविस्तर चर्चा करणे, मनपा नागरिकांना देत असलेल्या सुविधेबाबत सविस्तर चर्चा करणे. आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. निवेदनावर गटनेते विश्वजित बुधवंत, नगरसेवक डॉ. केदार खटिंग, रितेश झांबड, गणेश टाक आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
-----------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.