bjp govt ruin people of india says supriya sule politics Sakal
छत्रपती संभाजीनगर

Supriya Sule : भाजप सरकारने जनतेचे हाल केले- सुप्रिया सुळे

पैठण येथे राष्ट्रवादीतर्फे आयोजित विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गाव जनसंवाद यात्रेची सुरवात झाली.

सकाळ वृत्तसेवा

पैठण : सर्वसामान्य जनतेला त्रास देणाऱ्या भाजप सरकारने जनतेचे हाल केले आहे. यासाठी आता हे भाजपचे भ्रष्टाचारी सरकार बदलून आपले महाविकास आघाडीचे सरकार येत्या विधानसभा निवडणुकीत आणू, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी (ता. १९) व्यक्त केला.

पैठण येथे राष्ट्रवादीतर्फे आयोजित विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गाव जनसंवाद यात्रेची सुरवात झाली. यावेळी त्या बोलत होत्या. सुळे म्हणाल्या, लोकसभा निवडणूक जनतेने हाती घेतल्यामुळे विरोधकांना चांगली चपराक बसली आहे.

यातून राष्ट्रवादीला मोठे यश मिळाले असले तरी ही हवा डोक्यात जाऊ न देता कार्यकर्त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत विजयी होण्यासाठी जनतेच्या संपर्कावर भर द्यावा लागणार आहे, असे आवाहन त्यांनी केली.

यावेळी माजी मंत्री आमदार राजेश टोपे, माजी आमदार संजय वाघचौरे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, जिल्हाध्यक्ष पांडुरंग तायडे, शहराध्यक्ष उमेश पंडुरे, विलास शेळके, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष छाया जंगले, माजी नगराध्यक्ष अनिल घोडके, जिल्हा परिषद सदस्य अनिल जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

पैठण विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी माजी आमदार संजय वाघचौरे यांना द्यावी, अशी मागणी उपस्थित कार्यकर्त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे केली. याबाबत हास्य करत सुळे यांनी उमेदवारीचे हे काम प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे आहे, असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Overhead Cable Action: अनधिकृत ओव्हरहेड केबलवर महापालिकेची धडक कारवाई कायम; इंटरनेट बंद पडल्याने ‘वर्क फ्रॉम होम’ नोकरदारांची तारांबळ

GT vs RR Live : वैभव सूर्यवंशीची विक्रमी कामगिरी! यशस्वी जैस्वालसोबत मोडला सेहवाग-गंभीरचा विक्रम, रिषभ पंतवरही केली कुरघोडी

Pune News: शाळेतील फी वाढ अन्यायकारक! पुण्यात पालकांचं आंदोलन; मनसेच्या आंदोलकांनी केली पैशांची उधळण

Latest Marathi News Live Update : जय पवार यांनी बांधावर जाऊन केली नुकसानीची पाहणी

Pune Civic Negligence: पुण्यात बेमोसमी पावसानंतर धुळीचे लोट, रस्त्यावर खडी-मातीचा ढिगारा; महापालिका, ठेकेदारांच्या निष्क्रियतेने नागरिक हैराण

SCROLL FOR NEXT