prashant bamb prashant bamb
छत्रपती संभाजीनगर

'चंद्रकांत खैरेंचं काम औरंगजेबासारखं, खासदार जलील सरस'

काही दिवसांपूर्वी चंद्रकांत खैरेंनी ईसकाळला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की कराडांनी त्यांनी नगरसेवक आणि महापौर केले

प्रमोद सरवळे

काही दिवसांपूर्वी चंद्रकांत खैरेंनी ईसकाळला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की कराडांनी त्यांनी नगरसेवक आणि महापौर केले

औरंगाबाद: चंद्रकांत खैरेंचं काम औरंगजेबासारखं असून त्यांच्या काळात औरंगाबादचा काहीच विकास झाला नाही. खैरेंची ३० वर्षांची सत्ता औरंगाबादेत होती पण याकाळात शहर खिळखिळे झाले आहे. तसेच त्यांनी जिल्ह्याच्या विकासात अडचणी आणू नये. खैरे हे भागवत कराडांची कधीच बरोबरी करू शकत नाहीत, असा घणाघात भाजपाचे आमदार प्रशांत बंब यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी चंद्रकांत खैरेंनी ईसकाळला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की कराडांनी त्यांनी नगरसेवक आणि महापौर केले. तसेच रावसाहेब दानवेंनी जावयाला पुढे करून लोकसभा निवडणुकीत पाडल्याचाही आरोप खैंरेंनी केला होता. त्याला प्रत्यूत्तर देताना आमदार बंब यांनी खैरेंची तुलना औरंगजेबाशी केली आहे.

पुढे बोलताना आमदार बंब म्हणाले की, 'खैरेंपेक्षा विद्यमान खासदार इम्तियाज जलील चांगलं काम करत आहेत. जलील जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी झटत आहेत. जरी खासदार जलील एमआयएमचे असले तरी त्यांचे काम खैरेंपेक्षा चांगली आहेत. खैरेंनी मागील २० वर्षांपासून जिल्ह्यासाठी काहीच केलं नाही.' रावसाहेब दानवे यांनी मला पाडलं असा आरोपही खैरेंनी केला आहे. त्यावर बोलताना बंब म्हणाले, खैरेंना खरंतर २० वर्षांपूर्वीच पाडलं पाहिजे होतं. त्यांच्याकाळात जिल्ह्यात काहीच विकासकामे झाली नाहीत.'

चंद्रकांत खैरेंना केद्रीय मंत्री भागवत कराड कराडांनीही ट्विट करत उत्तर दिले आहे. खैरेंच्या या दाव्याचा समाचार कराड यांनी घेतला असून ‘तुम चाहे कितना भी किचड उछालो, मै कमल की तरह खिलता रहूंगा,’असे ट्विट त्यांनी केले आहे. ‘ई सकाळ’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी अनेक प्रश्नांवर उत्तरे दिली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आपला झालेल्या पराभव रावसाहेब दानवे यांच्या दगाबाजीमुळे झाल्याचा आरोप त्यांनी केला. 'युती असतानाही दानवेंनी अनेक नगरसेवक फोडले तसेच पैशांचा वापर करून दानवेंनी माझ्या विरोधात छुपा प्रचार केला होता,' असा थेट आरोप केला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे शहरात दहीहंडीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १० मंडळांवर गुन्हे; ११६ मंडळांवर न्यायालयीन खटले दाखल

द्विशतकवीर Ishan Kishan बाद होताच तिलक वर्माने धावत जाऊन मारली मिठी! प्रतिस्पर्धी कर्णधार असले तरी जिंकली मनं; Photo Viral

Nagpur Crime : सीताबर्डीत टोळीयुद्धातून कुख्यात गुंडाचा खून; चार कुख्यात गुन्हेगारांना अटक

Sugar price: साखर दरवाढीचा खेळ संपला! भाव कधी कमी होणार? सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी

अमरावतीतल्या 'त्या' वाघिणीचा अचानक मृत्यू, काही तांसापूर्वी वनविभागाने केलं होतं बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT