छत्रपती संभाजीनगर

सातोना येथे १४० जणांचे रक्तदान

CD
सातोना येथे १४० जणांचे रक्तदान परतूर,ता.१२ (बातमीदार) : सातोना (खु.) येथे स्व. महेशभाऊ सीतारामजी आकात यांच्या जयंतीनिमित्त महेशभाऊ आकात फाउंडेशनच्या वतीने आयोजित भव्य रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिराच्या पाचव्या वर्षी १४० दात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.यावेळी रक्तदात्यांचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. शिबिराचे उद्‍घाटन जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष कल्याणराव दळे यांच्या हस्ते झाले. यावेळी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, अशोकराव उबाळे, बदरभाई चाऊस, वैजनाथराव बागल, यश ग्रुपचे अध्यक्ष बालासाहेब आकात, बालासाहेब बिडवे, आसारामजी लाटे, परमेश्वर नाना आकात, डॉ. संजय लाटे, सिद्धार्थ बंड, नगरसेवक अंकुशराव तेलगड, भारतराव खंदारे आदी उपस्थित होते. शिबिर यशस्वी करण्यासाठी दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक, यश अर्बनचे कर्मचारी तसेच यश ग्रुपच्या सर्व कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला. ............. कोट स्व. महेशभाऊ आकात यांनी समाजसेवेचा दिलेला विचार पुढे नेणे हीच आमची जबाबदारी आहे. रक्तदान हे केवळ एक सामाजिक उपक्रम नसून गरजू रुग्णाचे प्राण वाचविण्याचे माध्यम आहे. दरवर्षी रक्तदात्यांचा वाढता प्रतिसाद आम्हाला अधिक सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा देतो. -बालासाहेब आकात, अध्यक्ष यश ग्रुप,सातोना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Aarti: यंदा गणपतीच्या आरतीसाठी पुस्तक शोधण्याची गरज नाही; सगळ्या आरत्या मिळवा एकाच ठिकाणी, एका क्लिकवर!

Savings: 10 रुपयांची बचत करून पती-पत्नी वर्षभरात करतील 1 लाखांचा फंड! ना SIP, ना शेअर मार्केट; काय आहे हे चॅलेंज?

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरण! आमदारपुत्र रोहित गावितला चार दिवसांची पोलीस कोठडी; काल मीरा रोडवरून घेतले होते ताब्यात

Girna Dam Water Storage : नाशिक अन् गुजरातच्या पावसाने गिरणा धरण फुल्ल! 21 हजार हेक्टर शेती फुलणार; काय आहे ताजी स्थिती?

Marathi News Live Updates : पुढील २४ तास विदर्भात पावसाची शक्यता,३ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT