झीरो माइल - मेट्रो कोचमध्ये आनंद लुटताना शाळकरी विद्यार्थी. 
छत्रपती संभाजीनगर

ना यशाचे कौतुक, ना निकालाची हूरहूर!विद्यार्थ्यांचा अपेक्षाभंग

संदीप लांडगे

दहावी किंवा बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दिशा ठरतात. त्यामुळे शालेय जीवनात या दोन्ही इयत्तेला अनन्यसाधारण महत्त्व असते.

औरंगाबाद : दहावी Secondary School Certificate किंवा बारावीची परीक्षा Higher Secondary Certificate Examination देण्याचा अनुभव वेगळाच असतो. परीक्षा दिल्यानंतर निकालाची उत्सुकता असते. यश मिळाल्यानंतर आप्त नातेवाईकांकडून कौतुकाचा वर्षाव होतो. यंदा कोरोनामुळे या कोणत्याही गोष्टीचा अनुभव घेता आला नाही. वर्षभर अभ्यास केला. पण परीक्षा झाल्या नाहीत, बारावीला Board Exam नसतो तर बरं झालं असतं, अशा भावना विद्यार्थ्यांनी ‘सकाळ’कडे व्यक्त केल्या. दहावी किंवा बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दिशा ठरतात. त्यामुळे शालेय जीवनात या दोन्ही इयत्तेला अनन्यसाधारण महत्त्व असते. वर्षभर अभ्यास केल्या नंतर शाळा, महाविद्यालयांकडून या विद्यार्थ्यांना निरोप दिला जातो. निरोप समारंभाच्या आठवणी मुले आयुष्यभर जपून ठेवतात. मात्र, यंदा कोरोनामुळे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना Student अशा सुवर्णक्षणांपासून वंचित राहावे लागले आहे. वर्षभर दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांनी घरी राहून ऑनलाईनच्या माध्यमातून अभ्यास केला. मात्र, ऐनवेळी परीक्षा रद्द झाली. त्यामुळे यशाचे कौतुक करणारे कोणी नाही. शाळा, महाविद्यालये प्रत्यक्ष सुरु असल्यानंतर सहकारी मित्रांचा किलबिलाट, क्लासला दांडी मारुन बाहेर खेळणे, चित्रपट पाहणे, मैदानावर मित्रांसोबत विविध खेळ खेळणे, मित्रांच्या खोड्या काढणे असे अनेक निरागस अनुभव यंदा विद्यार्थ्यांना घेता आले नाही. ही खंत आयुष्यभर राहणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.Board Exam Students Not Enjoyed School Life

निरोप समारंभ म्हणजे सुवर्णक्षण

शाळा, महाविद्यालय दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ आयोजित करतात. याप्रसंगी शालेय जीवनातील अनेक आठवणींना उजाळा दिला जातो. हा समारंभ विद्यार्थ्यांना खूप काही शिकवून जातो. शाळा, शिक्षक, मित्रांची ताटातूट, आनंदाचे क्षण, विद्यार्थ्यांचा उत्साह, आपण मोठे झाल्याची जाणीव या समारंभातून विद्यार्थ्यांना होते. निरोप समारंभाचे हे सुवर्णक्षण विद्यार्थी आयुष्यभर जपून ठेवतात.

विद्यार्थी म्हणतात...

बोर्डातील परीक्षेत यश मिळाल्यानंतर आईवडील, नातेवाईकांकडून कौतुकाचा वर्षाव होतो. पास झाल्यानंतर सर्वात जास्त आनंद आईबाबाला होतो. हा घरातील आनंद सोहळाच असतो. मात्र, यंदा परीक्षा रद्द झाल्याने निकालाची उत्सुकता नाही. त्यामुळे कौतुकाची थाप देणारे कोणीच नाही. वर्षभर अभ्यास केला. पण परीक्षा झाली नाही. त्यामुळे उत्साह नाही.

- शिवानंद गायकवाड

पाचवीपासून वाटायचे आपण दहावीला गेलो की, आमचाही निरोप समारंभ थाटात होईल. सर्व मित्र-मैत्रिणी एकत्र येऊन निरोप समारंभ उत्साहात साजरा करु. पण कोरोनामुळे निरोप समारंभाचा अपेक्षाभंग झाला आहे.

- शर्वरी कुलकर्णी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Mohibullah Ansari : कोण आहेत मोहिबुल्लाह अंसारी? अमेरिकेत मिळणार ‘एशियन हिरो अवॉर्ड’; जाणून घ्या IPS अधिकाऱ्याचा प्रेरणादायी प्रवास

Ladki Bahin Yojana August 2026 Installment GR : लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट हप्त्याचा GR आला; खात्यात 1,500 जमा होणार की 3,000 शासन निर्णयात नेमकं काय?

Vinod Kambli ने ठाण्याच्या हॉस्पिटलमधून पोस्ट केला Video; प्रकृतीबाबत सांगायचं सोडून, काय बोलतोय ऐका; नेटकरी म्हणाले...

Latest Marathi News Live Update : लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल; २२ तासांपासून विसर्जन मिरवणूक, थोड्याच वेळात बाप्पाला निरोप

IND vs WI: विराट कोहली अन् शुभमन गिल यांच्यात 'कड्याकाचं' भांडण? स्टार फलंदाज कर्णधाराला बोट दाखवत बडबडला Video Viral

SCROLL FOR NEXT