छत्रपती संभाजीनगर

बोधडी ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी आता बँक खात्यांपर्यंत

CD
ABD26J80932 गोकुंदा : बोधडी बु. ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत चौकशी करताना बीडीओ जयश्री वाघमारे. ---- बोधडी ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी आता बँक खात्यांपर्यंत --- बँक स्टेटमेंट मागविले; ग्रामसेवकाला ४८ तासांची नोटीस ----- गोकुंदा, ता. ८ (बातमीदार) : बोधडी बु. ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारींनंतर आता चौकशी अधिक व्यापक झाली आहे. ग्रामपंचायतीच्या विकास निधीच्या वापराबाबत करण्यात आलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर किनवट पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी जयश्री वाघमारे यांनी ग्रामपंचायतीच्या बँक खात्यांचे व्यवहार तपासण्याच्या दृष्टीने संबंधित बँकांकडून खाते विवरणपत्रे मागविली आहेत. गटविकास अधिकाऱ्यांनी ८ ऑक्टोबर रोजी आयसीआयसीआय बँक, वजिराबाद, नांदेड, स्टेट बँक ऑफ इंडिया, किनवट आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक, बोधडी बु. शाखेच्या व्यवस्थापकांना पत्र देऊन एक एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीतील ग्रामपंचायतीच्या बँक खात्यांचे स्टेटमेंट मागविले. विविध विकास योजनांतून प्राप्त अनुदान आणि त्यातून झालेल्या खर्चाची चौकशी करण्यासाठी ही माहिती आवश्यक असल्याचे पत्रात नमूद केले आहे. ग्रामनिधी, पंधरावा वित्त आयोग तसेच अन्य योजनांशी संबंधित आर्थिक व्यवहारांचीही तपासणी होण्याची शक्यता आहे. ---- मूळ अभिलेख सादर करण्याचे आदेश चौकशीसाठी ग्रामपंचायतीचे मूळ अभिलेख घेऊन उपस्थित राहण्याच्या सूचना देऊनही ग्रामसेवक प्रेमानंद बापूराव सिरसेवाड हे गुरुवारी (ता. आठ) ग्रामपंचायत कार्यालयात अनुपस्थित असल्याचे पंचायत समितीच्या पत्रात नमूद आहे. आवश्यक मूळ अभिलेख उपलब्ध न झाल्यामुळे तक्रार प्रकरणाची चौकशी करता आली नसल्याचेही पत्रात स्पष्ट केले आहे. ---- ग्रामसेवकाला नोटीस या प्रकरणी ग्रामसेवक प्रेमानंद सिरसेवाड यांना नोटीस बजावून ४८ तासांच्या आत तक्रारीशी संबंधित आवश्यक मूळ अभिलेख उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. निर्धारित मुदतीत अभिलेख सादर न केल्यास नियमानुसार शिस्तभंगाची कार्यवाही करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नांदेड यांच्याकडे सादर करण्यात येईल, असा इशारा नोटीसमध्ये देण्यात आला आहे. ---- विकासकामांबाबत ग्रामस्थांचे आरोप यापूर्वी १५ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेला सरपंच बालाजी भिसे व ग्रामसेवक प्रेमानंद सिरसेवाड अनुपस्थित असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता. त्यानंतर दोन ऑक्टोबर रोजीही दोघे उपस्थित नसल्याने उपसरपंचांनी सभा घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ग्रामस्थांनी सभा उधळून लावली होती. --- ..अन् १५ बाकडे गावात ग्रामपंचायतीच्या विकास निधीच्या वापराबाबत खो-खो मैदान, शाळेचे साहित्य, पाणीपुरवठा योजना तसेच अन्य विकासकामांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. २०२५ मध्ये बिल अदा झालेल्या बाकड्यांचाही मुद्दा चर्चेत आला असून, माहितीच्या अधिकारातून माहिती मागविल्यानंतर सहा ऑक्टोबर रोजी १५ बाकडे गावात आणण्यात आल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे. --- निधीचा गैरवापर आढळल्यास कारवाईची मागणी आता बँक व्यवहारांची तपासणी होणार असल्याने विकासकामांची बिले, अनुदानाची प्राप्ती, धनादेश व अन्य आर्थिक व्यवहारांची शहानिशा होणार आहे. चौकशीत आरोपांमागील वस्तुस्थिती स्पष्ट होण्याची अपेक्षा असून, निधीचा गैरवापर आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाना पाटेकर गेले, पण त्यांनी उभा केलेला ‘तो माणूस’ अजूनही जिवंत! राज ठाकरेंची भावूक पोस्ट

Navratri 2026: ११ ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सव सुरु; नऊ दिवसांच्या व्रतात काय करावे अन् काय टाळावे? जाणून घ्या नियम...

SIR voter list: देशातील 42 निवृत्त न्यायमूर्तींचं खुलं पत्र! SIR वरुन सुरु असलेल्या वादावर स्पष्ट केली भूमिका

Latest Marathi News Live Update: इंडिया आघाडीचे खासदार राजघाटावर

India Alliance Protest : 'देश हायजॅक केलाय, लोकशाहीची हत्या सुरूय'; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, आंदोलनासाठी 300 खासदार राजघाटावर

SCROLL FOR NEXT