छत्रपती संभाजीनगर

लातूरच्या माधव बावगे, सुनीता अरळीकर यांना यंदाचे बोधनकर स्मृती पुरस्कार

CD
सुनीता अरळीकर ABD26J78829 माधव बावगे ABD26J78830 ----- माधव बावगे, सुनीता अरळीकर यांना बोधनकर स्मृती पुरस्कार छत्रपती संभाजीनगर, ता. ७ : यंदाचा श्यामराव बोधनकर स्मृती पुरस्कार परिवर्तनवादी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते माधव बावगे यांना, तर इंद्रायणी बोधनकर स्मृती पुरस्कार सुनीता अरळीकर यांना जाहीर झाला आहे. २७ सप्टेंबरला लातूर येथे होणाऱ्या एका कार्यक्रमात पुरस्कार प्रदान केला जाईल. श्यामराव बोधनकर प्रतिष्ठानच्या वतीने पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष असलेल्या माधव बावगे यांना श्यामराव बोधनकर स्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. बावगे हे परिवर्तनवादी चळवळीमध्ये सक्रिय आहेत. त्यांना महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कारदेखील मिळाला आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी विज्ञान बोध वाहिनी व फिरते नभांगण यांसारख्या विज्ञाननिष्ठ उपक्रमांचे आयोजन त्यांनी सातत्याने केले आहे. यंदाचा इंद्रायणी बोधनकर स्मृती पुरस्कार लातूर येथील सुनीता अरळीकर यांना जाहीर करण्यात आला आहे. महिलांच्या उत्कर्षासाठी आणि सबलीकरणासाठी कार्य करणाऱ्या अरळीकर यांचे स्त्री भ्रूणहत्याविरोधी अभियानात मोलाचे योगदान आहे. तसेच बालविवाहविरोधी चळवळ, आंतरजातीय विवाह उपक्रमांमध्ये त्या सक्रिय आहेत. ‘हिरकणीचे बिऱ्हाड’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. २७ सप्टेंबर रोजी लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयामध्ये होणाऱ्या कार्यक्रमात पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे, असे श्यामराव बोधनकर प्रतिष्ठानचे डॉ. पी. डी. जोशी, डॉ. राघवेंद्र चाकूरकर, जयदेव डोळे, श्रीराम जाधव, डॉ. शिरीष खेडगीकर, डॉ. ऊर्मिला चाकूरकर, अभय बोधनकर, महेंद्र बोधनकर यांनी सांगितले.

CJI Surya Kant: देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; लेकीच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या महिलेला भरीव मदत

Pune News : विनापरवाना लावणीचा कार्यक्रम; मंडळाच्या अध्यक्षांसह नृत्यांगना राधा पाटील यांच्यावर गुन्हा दाखल

Social Media: 'Likes' मुळे वाढतोय मानसिक ताण? Post's च्या मोहात अडकतात डिप्रेशनग्रस्त लोक; संशोधनातून धक्कादायक खुलासा!

Marathi News Live Updates: तळेगाव ढमढेरे परिसरात विजेमुळे ग्रामस्थ त्रस्त

आई म्हणाली ‘चॉकलेट बंद कर’; स्क्वॉशपटू अनाहतने थेट न्यूट्रिशनिस्टलाच फोन केला! नेमकं काय घडलं? Viral Video

SCROLL FOR NEXT