Kidnapping 
छत्रपती संभाजीनगर

अंगरक्षकाच्या नोकरीसाठी फिटनेस ट्रेनरचे अपहरण

तीन तास डांबून ठेवल्यानंतर त्याला सोडण्यात आले

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : अंगरक्षकाच्या नोकरीसाठी फिटनेस ट्रेनरचे अपहरण करुण डांबून ठेवले. तीन तास डांबून ठेवल्यानंतर त्याला सोडण्यात आले. ही घटना बुधवारी (ता.१६) सायंकाळी घडली. त्यावरुन चौघांविरुद्ध क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

जालना रोडवरील फिटनेस स्टोन जीममध्ये सय्यद जुबेर सय्यद अजीज (वय.२५, रा. मिसबाह कॉलनी, पडेगाव) हे फिटनेस ट्रेनर म्हणून कामाला आहे. गेल्या काही दिवसांपासून शेख अश्रफ शेख बाबू हा जुबेरला अंगरक्षक म्हणून आपल्याकडे नोकरी कर म्हणत त्याचा पिच्छा पुरवत आहे. यापूर्वी जुबेर त्याचा अंगरक्षक म्हणून काम करायचा.

मात्र, आता जुबेरने त्याला अंगरक्षक होण्यासाठी नकार दिला आहे. या कारणातून गुरुवारी (ता.१७) अश्रफने साथीदार सय्यद ख्वाजा बिन, सलमान आणि टिपूच्या मदतीने मारहाण करुण बळजबरी कारमध्ये बसवून गारखेडा परिसरातील इंदिरानगरात नेले. तेथे एका खोलीत जुबेरला तीन तास डांबून ठेवले. त्यानंतर त्याची सुटका करण्यात आली. तेथून परतल्यानंतर रात्री जुबेरने क्रांतीचौक पोलिस ठाणे गाठत अपहरणाची तक्रार दिली. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक फौजदार नारायण गायके करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: ‘तुम्हाला तर स्वातंत्र्य २३ एप्रिल २०१४ ला मिळाली ना?’; कंगनाच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप, व्हिडिओ पाहा...

Mumbai Accident: इस्टर्न फ्रीवेवर मस्ती नडली, एकाचा मृत्यू दोघे गंभीर; दुचाकी अपघाताचा भीषण VIDEO

Maharashtra Companies : 6 लाखांवरून थेट 21 लाखांवर! मोदी सरकारच्या काळात कंपन्यांची संख्या कशी वाढली? उदय सामंतांचा मविआला सवाल, 'फेक नॅरेटिव्ह'वरुनही पलटवार

Marathi News Live Updates : मोहन भागवतांचा तरुणांना रोजगाराबाबत महत्त्वाचा संदेश

Devbhumi Jat Name Change Latest News : सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! 'देवभूमी जत' नामकरणाचा मार्ग मोकळा, गॅझेट नोटिफिकेशन लवकरच; पालकमंत्री चंद्रकांतदादांची माहिती

SCROLL FOR NEXT