छत्रपती संभाजीनगर

बुकनवाडी हत्याप्रकरणी अखेर २१ जणांवर गुन्हा दाखल नऊ आरोपींना ठोकल्या बेड्या

CD
बुकनवाडी हत्याप्रकरणी २१ जणांवर गुन्हा दाखल नऊ आरोपींना ठोकल्या बेड्या, ढोकी पोलिसांची कारवाई सकाळ वृत्तसेवा ः धाराशिव, ता. १३ ः तालुक्यातील बुकनवाडी येथे मोटारसायकल नेण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या तुफान हाणामारीत तरुण महेश सुरेश चामे (वय २४) याची हत्या झाल्याची घटना घडली होती. घटनेनंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, याप्रकरणी मृत तरुणाच्या वडिलांच्या फिर्यादीवरून ढोकी पोलिस ठाण्यात अखेर २१ आरोपींसह इतर साथीदारांविरुद्ध खुनासह विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून नऊ आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. इतर आरोपींचा शोध सुरू आहे. शुक्रवारी (ता. ११) रात्री साडेनऊच्या सुमारास बुकनवाडी येथील विठ्ठल-रुक्मिणी चौकात ही रक्तरंजित घटना घडली होती. याप्रकरणी शनिवारी (ता. १२) मृत तरुणाचे वडील सुरेश आप्पाराव चामे (वय ४०, रा. बुकनवाडी) यांनी फिर्याद दिली. त्यावरून बन्सी काळे, पिंटू काळे, देवराव काळे, कोंबड्या काळे, दत्ता काळे, बेगा काळे, शोभा काळे, यमुना काळे, कैलास काळे, पोपट शिंदे, कारकून शिंदे, महादेव शिंदे, मोतीराम काळे, तानाजी काळे, बादल काळे, मुकरा काळे, सचिन शिंदे, वैशाली शिंदे, गितू काळे, विशाल काळे, पापा शिंदे (सर्व रा. बुकनवाडी) आणि त्यांच्या इतर साथीदारांवर गुन्हा नोंदवला आहे. पाच जखमींवर उपचार सुरू; पोलिसांचा गावात फौजफाटा मारुती परगे, काका परगे, करण आवले, सतीश आवले आणि नाना आवले हे पाच जण काठ्या, कुऱ्हाड, कोयता, कत्ती व तलवारींच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UAE Accident: यूएईमध्ये भीषण अपघात; मृत्युमुखी पडलेल्या १३ जणांत भारतीयांचाही समावेश

आला रे आला! दोन वर्षांनंतर स्टार खेळाडू आयपीएलमध्ये खेळण्यास तयार; लिलावात नोंदवलं नाव, बेस प्राइज किती?

Shirur Crime News : शिरूरच्या मुंबई बाजारात भरदिवसा घरफोडी; दोन तोळे सोन्याचे दागिने आणि दोन लाख दहा हजारांची रोकड चोरीला

Kaygaon News : ऊस दरावरून पंचायत समिती सदस्य बळीराम खताळ आक्रमक; चेअरमन कृष्णा पा. डोणगावकर यांनी पाठवली एक कोटींची मानहानी नोटीस

Bhau Flex Kadha Portal : फ्लेक्सविरोधात पुणेकर सरसावले! ‘भाऊ फ्लेक्स काढा’ पोर्टलवर पहिल्याच दिवशी १५० हून अधिक तक्रारी

SCROLL FOR NEXT