छत्रपती संभाजीनगर

ब्रह्मविद्या प्रवचन सोहळ्याचा भक्तिमय वातावरणात समारोप

CD
ABD26J78291 (((फोटो ओळ)) मुकुंदवाडी ः जयभावानी चौकातील श्रीकृष्ण मंगल कार्यालयात सुरू असलेल्या लीळाचरित्र प्रवचन समारोप सोहळ्याला उपस्थित संत-महंत आणि भाविक. -- ब्रह्मविद्या प्रवचन सोहळ्याचा भक्तिमय वातावरणात समारोप -- श्रीचक्रधर स्वामींच्या विचारांचा जागर; संत-महंतांची उपस्थिती ---- सकाळ वृत्तसेवा मुकुंदवाडी, ता. ३१ ः ईश्वरभक्ती, समता, सदाचार आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या महिनाभराच्या ब्रह्मविद्या प्रवचन सोहळ्याचा दृष्टांतस्थळ तथा लीळाचरित्र प्रवचन समारोप सोहळा रविवारी (ता. ३०) जय भवानी चौकातील श्रीकृष्ण मंगल कार्यालयात भक्तिमय वातावरणात झाला. संत-महंतांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यास भाविकांची मोठी उपस्थिती होती. वसंत शिंदे यांच्या पुढाकारातून १ ऑगस्टपासून इंद्रप्रस्थ सोसायटी, पुंडलिकनगर रोड येथील त्यांच्या निवासस्थानी हा सोहळा झाला. संतोषमुनी शास्त्री यांच्या वाणीतून महिनाभर चक्रधर स्वामींचे विचार आणि ब्रह्मविद्येतील विविध दृष्टांतांचे निरूपण करण्यात आले. मानवी जीवन प्रपंचातील दुःखांनी व्यापलेले असून, या दुःखातून कायमस्वरूपी मुक्तीसाठी ईश्वरभक्ती हाच मार्ग असल्याचा संदेश प्रवचनातून देण्यात आला. हत्तीच्या दृष्टांतासह विविध दृष्टांतांच्या माध्यमातून स्वामींच्या विचारांची व्यापकता आणि समाजप्रबोधनाची ताकद स्पष्ट करण्यात आली. ‘चक्रधर स्वामींनी स्त्री-पुरुष समानता, स्पृश्य-अस्पृश्य समानता तसेच सर्व जीव समान असल्याचा मानवतावादी विचार मांडला’, असे सांगत त्यांनी व्यसनमुक्त समाज, सदाचार आणि संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी महानुभाव पंथाच्या कार्यावरही प्रकाश टाकला. समारोप सोहळ्यास फलटणकर बाबा, वाडीकर बाबा, अवेराज बाबा, अशोकराज भांडारकर बाबा, सायराज बाबा, बांधकर बाबा आणि जिल्हा महानुभाव परिषदेचे अध्यक्ष ॲड. नानासाहेब झिंजुर्डे यांची उपस्थिती होती. प्रा. मोहन बाभूळगावकर यांनी सूत्रसंचालन केले. ------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market: ट्रेडिंग गुरु अवधूत साठेंला SEBIचा दणका! 546 कोटी परत करण्याचे आदेश, 67 कोटी व्याज अन् 11.5 कोटींचा दंडही भरावा लागणार

Piyush Goyal : संशोधन-उद्योजक जोडण्यासाठी गोयल यांचा चार कलमी कार्यक्रम

IND vs NZ 2nd T20I Live: श्रेयस अय्यरचा त्रिफळा, अक्षर पटेलचा अफलातून झेल! मिचेल सँटनरने ११ चेंडूंत ३ विकेट्स घेतल्या, Video

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदी उद्या वाराणसी दौऱ्यावर; कसा असेल कार्यक्रम?

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात नवा खुलासा! सुरतमध्ये लपवलेले शस्त्र जप्त, 4 नवीन संशयितांना अटक

SCROLL FOR NEXT