दोन कॉलम
२९ नोव्हेंबरला राज्यस्तरीय ब्राह्मण मोफत वधू-वर परिचय मेळावा
परभणी, ता. १७ : अखिल भारतीय पेशवा संघटनेच्या वतीने सर्व शाखीय ब्राह्मण समाजासाठी २१ व्या राज्यस्तरीय मोफत वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन ता. २९ नोव्हेंबर रोजी परभणीतील वैष्णवी मंगल कार्यालय येथे करण्यात आले आहे. सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत हा मेळावा होणार आहे.
या मेळाव्याचे उद्घाटन बंडूनाना सराफ यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी योगेश जोशी सोनपेठकर राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले, माजी मंत्री सुरेशराव वरपुडकर, आमदार डॉ. राहुल पाटील, डॉ. राहुल आंबेगावकर आणि परळी वैद्यनाथचे माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय पेशवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सचिन वाडे-पाटील, राष्ट्रीय उपाध्यक्ष मोरेश्वर मार्डीकर, धनंजय नारळे, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाप्रमुख योगेश धर्माधिकारी, ब्राह्मण सभेचे अध्यक्ष रमेश देहेडकर, बीडचे जिल्हाप्रमुख अभय जोशी आणि नांदेड येथील ब्राह्मण सहाय्यक संघाचे अध्यक्ष अनिल डोईफोडे यांची उपस्थिती राहणार आहे. मेळाव्यासाठी सर्व शाखीय ब्राह्मण समाजातील प्रथम विवाह इच्छुक वधू-वरांसह घटस्फोटित, विधवा, विधूर आणि दिव्यांग वधू-वरांची नावनोंदणी सुरू आहे. इच्छुकांना प्रत्यक्ष मेळाव्याच्या ठिकाणीही नावनोंदणी करता येणार आहे. विवाह इच्छुक वधू-वरांनी पालकांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेचे जिल्हाप्रमुख तथा स्वागताध्यक्ष दीपक कासांडे, ज्येष्ठ समाजसेवक नंदकुमार पराडकर, विठू गुरु वझुरकर, जिल्हा संघटक श्वेता आचार्य, तालुकाध्यक्ष प्रताप कुलकर्णी आणि शहराध्यक्ष संजय कुलकर्णी यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.