Crime News Sakal
छत्रपती संभाजीनगर

Crime : 'तुझ्या नवऱ्याला जामिनावर सोडवतो...' असं म्हणत मध्यरात्री दीराचा भावजयीवर अत्याचार

पीडित महिलेचा पती हा एका गुन्ह्यामध्ये कारागृहात आहे.

सकाळ डिजिटल टीम

वाळूज : वाळूज पोलिस ठाण्याच्या हद्दीत दीराने धमकावत भावजयीवर बलात्कार केल्याची घटना लिंबेजळगाव (ता. गंगापूर) येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपी दिराला गुरुवारी पहाटे अटक केली.

पोलिसांनी सांगितले, की पीडित महिलेचा पती हा एका गुन्ह्यामध्ये कारागृहात आहे. त्यामुळे पीडित महिलेसह आरोपी दीर हे लिंबेजळगाव येथील घरी एकत्र राहतात. १४ ऑगस्टच्या रात्री १२ च्या सुमारास आरोपी दिराने भावजयीला झोपेतून उठवून मागील खोलीमध्ये येण्यास सांगितले.

पीडित भावजय मागील खोलीमध्ये गेल्यानंतर आरोपीने तिच्या पतीला जामिनावर सोडविण्याचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. तेव्हा पीडित भावजयीने त्यास नकार दिला. तरीही आरोपीने बळजबरीने पीडितेवर अत्याचार केला. यावरच न थांबता त्यानंतरही आरोपीने तीन ते चार वेळेस बलात्कार केला.

त्याचबरोबर ३० ऑगस्ट रोजी दुपारी आरोपी दीराने भावजयीवर पुन्हा अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पीडितेने वाळूज पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. वाळूज पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोशी दुर्घटना! ६० तासानंतरही ८ जणांचा शोध नाही, नातेवाईकांचा आक्रोश; मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा, आयुक्तांनी काय सांगितलं?

उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्यासह १५ अधिकारी निलंबित; महसूल विभागात गैरप्रकार, मंत्री बावनकुळेंची माहिती

Kaygaon News : विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मुख्याध्यापकांनीच उचलला तणनाशकाचा पंप; विद्यार्थी सुरक्षा आणि आरोग्याच्या काळजीसाठी पुढाकार

Mohol News : मोहोळ येथे पंचायत समिती प्रशासन व नगरपरिषद प्रशासनात मोठा संघर्ष, नवीन नगरपरिषद इमारत बांधकामाचा पेटला वाद

Ayodhya Ram Mandir: राम मंदिर चोरीप्रकरण! काँग्रेसला अटल बिहारी वाजपेयींची आठवण; जुन्या भाषणाचा दिला दाखला

SCROLL FOR NEXT