Aurangabad News 
छत्रपती संभाजीनगर

अंगणात आला म्हणून दिव्यांग बाळाला फावड्याने मारले

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : अंगणात आला म्हणून पाच वर्षांच्या बालकाला फावड्याने तोंडावर, डोक्‍यात तसेच कानावर मारहाण करून रक्तबंबाळ करणाऱ्या आरोपीला दोन वर्षे सक्तमजुरी व पाचशे रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त सहजिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. एस. कुलकर्णी यांनी ठोठावली. 

विष्णू विठ्ठल गायकवाड असे त्या आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे घटना घडल्यानंतर केवळ 11 महिन्यांत शिक्षा ठोठावण्यात आली आहे. 

याप्रकरणी पीडित मुलाचे वडील दीपक दशरथ चांदणे (38, रा. पाचोड, ता. पैठण) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादी व शिक्षा ठोठावण्यात आलेला विष्णू विठ्ठल गायकवाड (33) हे एकाच गल्लीत राहतात. पाच फेब्रुवारी 2018 रोजी सकाळी दीपक यांच्या पाच वर्षांच्या जन्मजात मुक्‍या मुलाला अंगणात आला, म्हणून विष्णूने फावड्याने बेदम मारहाण केली. 

यात मुलाच्या डोक्‍यातून, नाकातून रक्तस्राव होत होता व दोन दातदेखील पडले होते. त्यामुळे दीपकने मुलाला तातडीने पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात व तिथून घाटीत दाखल केले.

प्रकरणात तक्रारीवरून पाचोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. खटल्यावेळी, सहायक सरकारी वकील उल्हास पवार यांनी सहा साक्षीदारांचे जबाब नोंदवले. यामध्ये डॉक्‍टर व दीपकची साक्ष महत्त्वाची ठरली. 

दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरून न्यायालयाने विष्णूला दोषी ठरवून भारतीय दंड संहितेच्या कलमान्वये दोन वर्षे सक्तमजुरी व पाचशे रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावली. ऍड. पवार यांना ऍड. अविनाश कोकाटे यांनी साहाय्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : पगारवाढीबाबत मोठी घडामोड; कर्मचाऱ्यांच्या पदरात काय पडणार? बैठकीपूर्वी मोठी तयारी, किमान वेतन थेट ६९ हजारांवर...?

IPL 2027 Retaintion: सनरायझर्स हैदराबादचा स्टार गोलंदाज शुभमन गिलच्या संघात; दोन वेळा जिंकलीय पर्पल कॅप

Satara News: आता स्‍वबळावर चालणार गावगाडा! जिल्हा वार्षिक योजनेतून ग्रामपंचायतींना उत्पन्नाचे नवे स्रोत उपलब्‍ध करण्‍यास मंजुरी

काव्या मारनच्या SRH ला धक्का! IPL 2027 मध्ये दिसणार नाही अभिषेक शर्मा-ट्रॅव्हिस हेडची जोडी

IPL 2027 Retention : चेन्नई सुपर किंग्सने MS Dhoni ला रिलीज करावं, ४ कोटी वाचतील अन्...; नेमकं कोण म्हणतंय असं?

SCROLL FOR NEXT