आडुळ (जि.औरंगाबाद) : राहते दुमजली माळद कोसळून आजोबा व नात यांचा कोसळलेल्या घराच्या मातीत दबुन मृत्यू, तर नातु हा गंभीर जखमी झाल्याची घटना घारेगाव (ता.पैठण) घडली.  
छत्रपती संभाजीनगर

पैठण तालुक्यात दुमजली इमारत कोसळून आजोबा, नात ठार; आजी बचावली

शेख मुनाफ

आडुळ (जि.औरंगाबाद) : राहते दुमजली माळद कोसळून आजोबा व नात यांचा कोसळलेल्या घराच्या मातीत दबुन मृत्यू, तर नातु हा गंभीर जखमी झाल्याची घटना घारेगाव (ता.पैठण) (Paithan) येथे शनिवारी (ता.२५) रोजी मध्यरात्री घडली. यात आई, आजी व नातुचे सुदैवाने प्राण वाचले. घारेगाव येथे जगदीश विठ्ठल थोरे (वय ६०) हे शेतकरी कुटुंब आपल्या वडिलोपार्जित माळद (दुमजली इमारतीत) गेल्या अनेक वर्षांपासून राहतात. शनिवारी (ता.२५) रोजी मध्यरात्री घारेगाव परिसरात जोरदार अतिवृष्टी झाली. त्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून सतत पाऊस पडत असल्याने या दुमजली (Aurangabad) माळदाच्या भिंतीत पावसाचे पाणी मुरले. त्यामुळे रात्री एक वाजेच्या सुमारास ही इमारत कोसळली. त्यावेळी तळमजल्यावर जगदीश विठ्ठल थोरे (वय ६०), त्यांची नात वेदिका ज्ञानेश्वर थोरे (वय १२) व पत्नी कांताबाई जगदीश थोरे (वय ५५) हे झोपले होते, तर दुसऱ्या मजल्यावर सुन रेणुका ज्ञानेश्वर थोरे (३४) आणि नातु शुभम ज्ञानेश्वर थोरे (८) हे झालेले होते.

मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास परिसरात जोरदार पाऊस सुरु झाला. त्यामुळे इमारत कोसळली. यात खालच्या मजल्यात झोपलेले जगदीश थोरे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गावातील संदीप थोरे, सचिन थोरे, शिवाजीराव थोरे, गणेश थोरे, बबन थोरे, योगेश थोरे, विष्णु पवार, रामेश्वर थोरे, रुषी थोरे, बाळु थोरे, सुधीर थोरे यांनी मदत कार्य करीत जखमी रेणुका थोरे, शुभम थोरे यांना आडुळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले. मात्र उपचारादरम्यान रेणुका हिचा मृत्यू झाला, तर शुभम याच्यावर उपचार सुरू आहेत. याची नोंद पाचोड पोलिस ठाण्यात घेण्यात आली असून पुढील तपास ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार जगन्नाथ उबाळे, रविंद्र क्षीरसागर हे करीत आहे.

दैव बलवत्तर म्हणून वाचले प्राण

मृत जगदीश थोरे यांच्या पत्नी कांताबाई या लघुशंकेसाठी बाहेरील स्वच्छतागृहात गेले होते. नेमके त्याच वेळी इमारत कोसळली. माळदावर झोपलेल्या रेणुका थोरे ज्यावेळी इमारत कोसळत होती. त्यावेळी जागा झाल्या होत्या. त्यांनी आरडाओरडा केली. मात्र तोपर्यंत इमारत कोसळली होती.

वेदिकाच्या किंकाळ्या

कोसळलेल्या इमारतीच्या मलब्याखाली दबलेली वेदिका ही मदतीसाठी किंकाळ्या मारत होती. त्यामुळे ग्रामस्थ मलब्याखाली दबलेली वेदिका याला वाचविण्यासाठी भरपावसात सर्व मलबा बाजुला काढुन तिला बाहेर काढले व उपचारासाठी आडुळला आणले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs ZIMW 3rd T20I: भारताचा दणदणीत विजय; हरमनप्रीत, शफाली वर्माची फटकेबाजी; झिम्बाब्वेविरुद्धची मालिका ३-० ने खिशात

शनि मार्गी होताच ३ राशींचं नशीब पालटणार! रखडलेली कामं पूर्ण होणार, धनलाभाचे योग

Dasara Melava 2026: संजय राऊतांचा अमित शाहांवर हल्लाबोल; 'लॉरेन्स बिश्नोई अस्तित्वात नाही, अमित शाह हेच लॉरेन्स बिश्नोई'

Eknath Shinde : "शेतकऱ्यांच्या लेकींच्या लग्नाचा सर्व खर्च आमचा"; दसरा मेळाव्यातून एकनाथ शिंदेंची सर्वात मोठी घोषणा!

INDW vs ZIMW 3rd T20I: १० चौकार, ५ षटकार अन् ९१ धावा! हरमनप्रीत कौर रडली, चेहरा लपवताना दिसली; म्हणाली, त्या शब्दांनी...

SCROLL FOR NEXT