marhan sakal
छत्रपती संभाजीनगर

Jalna News : खासगी फायनान्स कंपन्यांची दादागिरी; खातेदाराला मारहाण

इंडिया शेल्टर फायनान्स कंपनीच्या मॅनेजर व कर्मचाऱ्यांची मुजोरी; गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

अंकुशनगर : खातेदाराच्या घरात घुसून कर्जदार व त्यांच्या नातेवाईकांना शिवीगाळ व मारहाण करून घरातील वस्तूंची तोडफोड केल्याची घटना महाकाळा (ता.अंबड) येथे घडली. याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथील इंडिया शेल्टर फायनान्स कंपनीच्या मॅनेजर व सहकाऱ्यांवर गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कृष्णा वासुदेव लाड (रा.महाकाळा) यांनी मागील दीड वर्षापूर्वी त्यांनी घर बांधकामासाठी इंडिया सेल्टर फायनान्स, (खाजगी कंपनी) छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून ९ लाख रुपये कर्ज घेतले होते. बँकेचे मॅनेजर किरण देवकाते यांच्याकडे लाड यांनी नोव्हेंबर २०२३ पर्यंत रितसर हप्ते भरले आहेत.

परंतु, ४ डिसेंबरला दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास फायनान्स बँकेचे मॅनेजर किरण देवकाते, गौतम उबाळे व रोहिणी ठोंबरे यांनी कृष्णा लाड यांच्या चुलत्याला फोन करुन सांगितले की, तुमचा पुतण्या कृष्णा वासुदेव लाड यांनी घेतलेले कर्जाचे हप्ते भरा, असे म्हणताच त्यांनी सांगितले की, नोव्हेंबर २०२३ पर्यंत तुमचे रितसर हप्ते भरलेले आहे. या पण, हप्त्याची पण व्यवस्था करतो,असे सांगितले.

परंतु, सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर येथून इंडिया सेल्टर फायनान्स (खाजगी कंपनी) बँकेचे मॅनेजर किरण देवकाते, गौतम उबाळे व रोहिणी ठोंबरे व इतर एक अनोळखी व्यक्तींनी महाकाळा येथे येत शिवीगाळ केली. तसेच साडेसहा वाजेच्या सुमारास शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या कार्यालयासमोर असलेल्या कुंड्या व दगड मारून कार्यालयाच्या काचा फोडून व काचेचा दरवाजा तोडून नुकसान केले. कार्यालयातील खुर्च्यांची मोडतोड केली.

स्थानिक लोकांनी समजावण्याचा प्रयत्न केला त्या लोकांना मारहाण करून शिवीगाळ केली. तेव्हा प्रा. राजेंद्र लाड यांच्या तक्रारीवरून किरण देवकाते, गौतम ऊबाळे, रोहिणी ठोंबरे विरुद्ध ( सर्व रा.गारखेडा परिसर, छत्रपत्री संभाजीनगर) यांच्याविरुद्ध गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT