छत्रपती संभाजीनगर

एसटीच्या धडकेत ठार झालेल्या तरुणाच्या पालकांना २२ लाख ३२ हजारांची भरपाई

CD
बस अपघातातील मृतांच्या वारसांना २२ लाखांची भरपाई छत्रपती संभाजीनगर, ता. ४ : एसटी बसच्या धडकेत ठार झालेल्या २२ वर्षीय तरुणाच्या आई-वडिलांना २२ लाख ३२ हजार ८०० रुपयांची नुकसानभरपाई ६ टक्के व्याजासह देण्याचे आदेश मोटार अपघात दावा लवादाचे सदस्य सुधाकर एन. सोनवणे यांनी दिले. ही भरपाई एसटी महामंडळ व संबंधित चालकाने संयुक्तपणे द्यावी, असे आदेशात स्पष्ट केले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील धाड येथे ५ जानेवारी २०२६ रोजी कैलास साहेबराव शिंदे हा तरुण मित्रांसोबत मोटारसायकलवरून जात असताना भरधाव एसटी बसने (एमएच ०६ बीडब्ल्यू ३६३८) त्यांना समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात कैलासचा मृत्यू झाला. मयत हा गवंडी व सेंट्रिंग काम करून दरमहा ४५ हजार रुपये कमवत होता आणि कुटुंबाचा आधार होता, असा दावा करत आई शोभा व वडील साहेबराव शिंदे यांनी ॲड. यू. ए. देशमुख यांच्यामार्फत भरपाईसाठी लवादात याचिका दाखल केली होती. सुनावणीदरम्यान रस्त्यावरील ६८ फुटांचे ब्रेक मार्क्स लक्षात घेऊन लवादाने बसचा वेग अधिक असल्याचे नमूद केले. मयत तरुण दुचाकीवर मागे बसलेला असल्याने त्याचा स्वतःचा कोणताही निष्काळजीपणा नव्हता, असा निष्कर्ष काढत ‘संयुक्त निष्काळजीपणा’च्या तत्त्वाखाली लवादाने एसटी महामंडळाला पूर्ण भरपाई देण्यास जबाबदार धरले. उत्पन्नाचा कोणताही ठोस पुरावा नसतानाही कामगार विभागाच्या किमान वेतनानुसार मयताचे मासिक उत्पन्न १४ हजार रुपये, वय २२ वर्षे आणि कायदेशीर गुणक लावून २२ लाख ३२ हजार ८०० रुपयांची भरपाई मंजूर केली.

Tejas Express: तेजसच्या प्रवासात मोदकांचा गोडवा! गणेशोत्सवात भाविकांसाठी आयआरसीटीसीची खास मेजवानी

India vs Japan: टीम इंडिया 'सुझुकी कप'साठी जपानच्या दौऱ्यावर; कधी खेळला जाणार ऐतिहासिक सामना? BCCI कडून घोषणा

पार्किंगमध्ये स्ट्रेचरवर आईचा मृतदेह अन् बाजूला बसलेला हताश बाप; झाशीच्या वैद्यकीय महाविद्यालयात हृदयद्रावक घटना

Marathi News Live Updates : अमरावतीत अल्पवयीन तरुणीची हत्या प्रकरण, आरोपीला ८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

Maratha Reservation : सकल मराठा समाजाच्या वतीने पुणे-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर आष्टामोड येथे ‘रास्ता रोको’ आंदोलन

SCROLL FOR NEXT