छत्रपती संभाजीनगर

लातुरात रंगणार ‘बसव-देशीकेंद्र स्वरमहोत्सव’ दिवाळीनिमित्त सुरेल संगीताची पर्वणी;

CD
फोटो- प्रा. विजयकुमार धायगुडे दीपिका गीते-डिंगोळे -- लातुरात रंगणार ‘बसव-देशीकेंद्र स्वरमहोत्सव’ दिवाळीनिमित्त सुरेल संगीताची पर्वणी; लिंगायत शरण फाउंडेशनचा पुढाकार --- सकाळ वृत्तसेवा लातूर, ता. ५ : दिवाळीच्या निमित्ताने लिंगायत शरण फाउंडेशनच्या वतीने शुक्रवारी (ता.सहा) सांस्कृतिक, संगीतमय व आध्यात्मिक परंपरेचा समृद्ध वारसा जपणाऱ्या ‘बसव-देशीकेंद्र स्वरमहोत्सव’चे आयोजन करण्यात आले आहे. जगद्‍गुरू महात्मा बसवेश्वर यांचे समतावादी विचार, देशीकेंद्र महाराजांचे आध्यात्मिक मार्गदर्शन आणि शरण संस्कृतीचा अनमोल वारसा सुरेल स्वरांच्या माध्यमातून जनमानसापर्यंत पोचविणे, हा या स्वर महोत्सवाचा प्रमुख उद्देश आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने भाव, भक्ती आणि संगीत यांचा त्रिवेणी संगम अनुभवण्याची संधी रसिकांना लाभणार आहे. उत्तमोत्तम भक्तिगीते, भावपूर्ण स्वर रचना आणि सुरेल संगीताच्या माध्यमातून आध्यात्मिक आनंदाची अनुभूती घेता येणार आहे. हा स्वर महोत्सव महात्मा बसवेश्वर महाविद्यालय येथे सायंकाळी ६ ते रात्री ८ या वेळेत होणार आहे. यामध्ये गायक प्रा. विजयकुमार धायगुडे, दीपिकाताई गीते-डिंगोळे आणि भार्गवी काशीद हे गायन सादर करणार आहेत. त्यांना संवादिनीवर गणेश सुतार व संतोष थोरात, तबल्यावर प्रा. परमेश्वर पाटील, पखवाजवर महेश वंगवाड आणि तानपुरावर प्रा.कल्याण पाटील साथ संगत करणार आहेत. यावेळी विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदिनाथ सांगवे, पोलिस उप अधीक्षक समीरसिंह साळवे, राम बोरगावकर, तुकाराम पाटील, डॉ. योगानंद दडगे, शिरीष उटगे, सुनील मिटकरी, प्रदीप दिंडेगावे, विश्वनाथ निगुडगे, डॉ.सिद्राम डोंगरगे उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात उपमहापौर ॲड. स्नेहल उटगे, जिल्हा कोषागार अधिकारी उज्ज्वला भाऊसाहेब पाटील, आणि रामदास भोसले यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. या स्वर महोत्सवास शहर व परिसरातील नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आवाहन लिंगायत शरण फाउंडेशनचे अध्यक्ष व महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव माधवराव पाटील टाकळीकर यांनी केले. -----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought Relief : ७३ लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी ५ हजारांची मदत - फडणवीसांची माहिती; उर्वरितांना दोन दिवसांत रक्कम मिळणार

Satara Farmer Loan Waiver: सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा! ३४ हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ, चौथी यादी जाहीर

Navi Mumbai: माजी मंत्र्याचा अनधिकृत कारभार? मोरबे धरण क्षेत्रात अलिशान फार्म हाऊसची उभारणी, नवा वाद पेटण्याची शक्यता

Latest Marathi News Live Update : जंतरमंतर किंवा इतर कोणत्याही ठिकाणी तिरंगा फडकवणे गुन्हा मानला जाऊ नये - आशुतोष रांका

IPL 2027 Trade: चेन्नई सुपर किंग्सने हार्दिक पांड्याला 'ठेंगा' दाखवला; SRH चे दोन तगडे खेळाडू आपल्या संघात घेतले, त्याबदल्यात कोणाला दिले?

SCROLL FOR NEXT