छत्रपती संभाजीनगर

वाहन घेताना ग्राहक म्हणून काय तपासावे ?

CD
((ग्राहक हक्क)) ---- वाहन घेताना ग्राहक म्हणून काय तपासावे? ---- काही दिवसांपूर्वी माझ्या एका जवळच्या वकील मित्राला नवीन दुचाकी घ्यायची होती. पेट्रोलची स्कूटर घ्यावी की इलेक्ट्रिक, याचा तो विचार करत होता. पेट्रोलचे वाढते दर आणि इलेक्ट्रिक स्कूटरमुळे होणारी बचत पाहता त्याचा कल इलेक्ट्रिक वाहनाकडे थोडा जास्त होता. गाडी निवडताना तो तिची एका चार्जमध्ये धावण्याची क्षमता, बॅटरी किती वर्ष चालणार, बॅटरी बदलण्याचा खर्च आणि कंपनीची वॉरंटी यांची माहिती घेत होता. त्याच्याशी बोलताना मला एक साधा प्रश्न पडला. आपण गाडीचे मायलेज, किंमत आणि देखभालीचा खर्च इतक्या बारकाईने तपासतो, मग ज्या कंपनीची गाडी घ्यायची आहे, त्या कंपनीविरुद्ध ग्राहक मंचामध्ये किती तक्रारी दाखल झाल्या आहेत, हेही तपासायला नको का? आज रस्त्यावर इलेक्ट्रिक स्कूटरची संख्या वाढताना दिसत आहे. चार्जिंगचा तुलनेने कमी खर्च, घरच्या घरी चार्जिंगची सोय आणि पेट्रोल पंपावर जाण्याची गरज नाही, या गोष्टी ग्राहकांना आकर्षित करतात. पण, गाडी खरेदी करताना जाहिरातीत दाखवलेली कामे आणि प्रत्यक्ष वापरात मिळणारा अनुभव नेहमी सारखाच असेल, असे नाही. काही काळानंतर बॅटरीची क्षमता कमी होणे, वारंवार तांत्रिक बिघाड होणे, काही भागांसाठी प्रतीक्षा करावी लागणे किंवा सर्व्हिस सेंटरकडून वेळेत प्रतिसाद न मिळणे, अशा समस्या उद्‍भवू शकतात. चंदीगडच्या जिल्हा ग्राहक आयोगाने सदोष इलेक्ट्रिक स्कूटरच्या प्रकरणात बॅटरी बदलून देण्यासह ग्राहकाला भरपाई आणि खटल्याचा खर्च देण्याचे निर्देश दिले होते. अशा प्रकरणांकडे केवळ एखाद्या कंपनीविरुद्धचा वाद म्हणून पाहण्याऐवजी ग्राहकांच्या हक्कांच्या दृष्टीने पाहणे आवश्यक आहे. वाहन खरेदी केल्यानंतर त्यात दोष आढळल्यास किंवा संबंधित सेवेत त्रुटी राहिल्यास ग्राहकाला कायदेशीर मार्गाने दाद मागता येते. मग गाडी खरेदी करण्यापूर्वी ग्राहकाने नेमके काय करावे? संबंधित कंपनीविरुद्ध ग्राहक आयोगात दाखल झालेल्या तक्रारींची आणि दिलेल्या आदेशांची माहिती मिळवावी. तक्रारी बॅटरीच्या दोषांबाबत आहेत, की विक्रीनंतरच्या सेवेशी संबंधित आहेत, कंपनीने त्या सोडविण्यासाठी काय केले आणि आयोगाने काय निर्णय दिला, हे समजून घ्यावे. ग्राहक आयोगांचे उपलब्ध आदेश आणि विश्वासार्ह वृत्तपत्रांतील बातम्या यासाठी उपयोगी ठरू शकतात. ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत सदोष वस्तू, सेवांमधील त्रुटी आणि अनुचित व्यापार पद्धतींबाबत योग्य परिस्थितीत ग्राहक आयोगाकडे दाद मागता येते. मात्र, तक्रार दाखल करण्याची वेळ येण्यापूर्वीच काही गोष्टी तपासल्या, तर भविष्यातील अडचणी टाळण्यास मदत होऊ शकते. कंपनीची वॉरंटी नेमकी कोणत्या बाबींना लागू आहे. बॅटरी बदलण्याचा संभाव्य खर्च किती आहे. जवळ सर्व्हिस सेंटर आहे का आणि तक्रार नोंदविल्यानंतर कंपनी किती तत्परतेने प्रतिसाद देते, हे प्रश्न गाडीच्या किमतीइतकेच महत्त्वाचे आहेत. शेवटी, नवीन स्कूटर खरेदी करताना आपण केवळ एक वाहन विकत घेत नसतो. आपण त्या कंपनीच्या उत्पादनावर आणि विक्रीनंतरच्या सेवेवरही विश्वास ठेवत असतो. त्यामुळे पुढच्या वेळी इलेक्ट्रिक स्कूटर निवडताना, ही गाडी एका चार्जमध्ये किती किलोमीटर चालते? या प्रश्नाबरोबरच आणखी एक प्रश्न विचारायला हवा उद्या गाडीत बिघाड झाला, तर ही कंपनी माझी समस्या सोडविण्यासाठी किती तत्पर असेल? कारण गाडी चांगली असणे महत्त्वाचे आहेच, पण गाडी घेतल्यानंतर ग्राहकाला एकट्याला झगडावे लागू नये, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. - ॲड. अमोल वाघमारे ९०६७१२९२२२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIRAT KOHLI: विराट कोहलीचा सराव सुरू, न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेचा थरार कधी रंगणार? जाणून घ्या ५ सामन्यांचं संपूर्ण वेळापत्रक

Manoj Jarange Patil : ५०० कोटींच्या प्रकरणाचा छडा लागेपर्यंत विषय संपवणार नाही; मनोज जरांगेंचा फडणवीस, शिंदेंना तपासाचे आव्हान

''गेल्या दोन दिवसांपासून आम्ही...''; ५०० कोटींच्या कथित ऑडियो क्लिपबाबत श्रीकांत शिंदे पहिल्यांदाच बोलले, काय म्हणाले?

IND vs NZ 2nd T20: ६ चेंडूंत ११ धावा, शेवटच्या चेंडूपर्यंत थरार! तिलक-नितीशने पलटवला सामना, भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय!

AI Revolution: तुम्ही फक्त उद्योग सुरू करण्याचे धाडस करा, AI एजंट्सच चालविणार तुमचा बिझनेस? कसे ते वाचा...

SCROLL FOR NEXT