This B/W Photo automatically Turns Into COLOUR Know How It Is  
छत्रपती संभाजीनगर

हा ब्लॅक अॅण्ड व्हॉइट फोटो आपोआप होतो कलर, जाणून घ्या कारण...

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : सध्या सोशल मीडियावर तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे एक छायाचित्र व्हायरल झाले आहे. ब्लॅक अॅण्ड व्हॉइट असलेल्या या छायाचित्रातील बिंदूकडे ३० सेकंद टक लावून पाहिले आणि त्यानंतर डोळे बंद करून भिंतीकडे तोंड करून डोळे २-३ वेळा उघडझाप करून पाहिले तर हे ब्लॅक अॅण्ड व्हॉइट छायाचित्र भिंतीवर रंगीत झालेले दिसते. अनेकांनी हा अनुभव घेतला. त्यामुळे नेमका हा काय प्रकार आहे, असे का होते, या बाबत eSakal.com ने जाणून घेतलेली खास माहिती...

काय म्हणतात नेत्रतज्ज्ञ?
 

या बाबत आम्ही इंटरनेटवर शोध घेतला. त्यात असे अनेक छायाचित्र आढळले. शिवाय या बाबत डॉ. अमित सिंघल यांनी दिलेली माहितीही एका वेबसाइटवर होती. डॉ. सिंघल म्हणतात, ‘जेव्हा-केव्हा आपण एक गडद आणि एक हलका असा क्रॉन्ट्रास्टिंग रंग पाहतो तेव्हा गडद रंगाचा जो भाग आहे. त्यामुळे फोटोरिसेप्टरची केमिकल रिअॅक्शन करणारे केमिकल संपत जाते. परिणामी, आपल्याला सर्व काही हलक्या बॅकग्राउंडमध्ये दिसते. व्हॉट्सअॅपवर सध्या जे छायाचित्र व्हायरल होत आहे, त्यातील एक भाग गडद आहे आणि दुसरा फिक्का म्हणजेच हलका आहे. गडद रंगाला काही वेळ टक लावून पाहिल्यानंतर तो हलका होतो.

त्यानंतर आपण इतर हलक्या रंगाच्या जागेकडे फोकस करतो तर त्या ठिकाणी हलका रंग गडद दिसतो आणि गडद रंग हलका दिसतो. त्यातून पूर्वीची ब्लॅक अॅण्ड व्हाइट प्रतिमा रंगीत दिसते. एकूणच काय तर कॅमेऱ्यातील रिलमधील फोटो डेव्हलप केल्यानंतर फोटो जसा दिसतो तसाच तो या ठिकाणी दिसतो. या प्रक्रियेत डोळे आणि मेंदू दोघेही सक्रिय होतात.’ 

हे सामान्य आहे

हे छायाचित्र आम्ही औरंगाबाद येथील नेत्रतज्ज्ञ काही नेत्रतज्ज्ञांना व्हॉट्सअॅप केले. त्यावर त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. ‘‘हा प्रकार सामान्य आहे. यात वेगळे असे काही नाही,’’ अशी प्रातिनिधिक प्रतिक्रिया त्यांनी दिली.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा कहर! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन; दिला सतर्कतेचा इशारा

Nagpur Vidhan Bhavan Project: नागपूर विधानभवनाचे रूपडे पालटणार; १,००० कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प, दोन्ही सभागृह येणार एकाच छताखाली

Latest Marathi Live Update : लोणावळ्या कडे जाणाऱ्या रोडवर दरड कोसळली, कातळ धबधबा शेजारची घटना

Maharashtra Rain: पालघरमध्ये मुसळधार! 24 तासांत 134 मिमी पाऊस, जनजीवन विस्कळीत; वाहतूक ठप्प

Navi Mumbai: बटाटावड्यात आढळली अळी, नवी मुंबई महापालिकेच्या भोजनालयातील प्रकार

SCROLL FOR NEXT