Ghati-Hospital sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar : कर्करोग रुग्णालयात दुकान

आधी झाला करार अन् आठ दिवसांनी मागितली परवानगी,शासनाचे पत्र २०१९ चे पण `जनऔषधी` सुरू २०२३ मध्ये

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : एका मेडिकल चालकाने थेट शासकीय कर्करोग रुग्णालयात ‘मोफत’ जनऔषधीचे दुकान थाटल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, २०१९ मध्ये वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने काढलेल्या पत्राचा आधार घेत जानेवारी २०२३ मध्ये हे जनऔषधी दुकान उघडण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे. तसेच करार आधी झाला आणि नंतर आठवडाभराने परवानगी मागितल्याचेही उघडकीस आले आहे.

संचालनालयाने जुलै २०१९ मध्ये पत्र काढत संस्थेअंतर्गत येणाऱ्या विविध रुग्णालयांमध्ये जनऔषधी दुकाने सुरू करण्यासाठी परवानगी देण्याच्या सूचना केल्या होत्या. यात छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, शासकीय कर्करोग रुग्णालय यासह धुळे व बारामती येथील रुग्णालयांचा समावेश होता. या आधारावर शासकीय कर्करोग रुग्णालयात जनऔषधी दुकानासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे, संबंधितांशी केलेल्या करारामध्ये ‘मोफत तत्त्वावर देण्यात आलेल्या दुकानासाठी’ असा उल्लेख आहे.

जनऔषधी उपलब्ध नसल्यास ब्रँडेड अथवा इतर औषधे रुग्णांना उपलब्ध करून देताना एमआरपीवर दहा टक्के सवलत देणे असेही करारात नमूद आहे. या विषयावरून नुकत्याच झालेल्या अभ्यागत समितीच्या बैठकीत जोरदार चर्चा झाली. यामागचे एक एक गौडबंगाल आता समोर येत असल्याने, चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे.

काही प्रश्‍नांचे गौडबंगाल कायम

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाच्या जुलै २०१९ च्या पत्रात, तीन दिवसात संबंधित मेडिकलचालक संस्थेला जागेचा ताबा द्यावा, असा उल्लेख आहे. असे असताना संबंधितांनी २०२३ मध्ये परवानगी मागितली कशी?

जनऔषधीतील औषधे उपलब्ध नसल्यास, ब्रँडेड व इतर औषधे एमआरपीच्या दहा टक्के सवलतीत उपलब्ध करून द्यावी. म्हणजे बाहेरच्या औषधींचीही विक्री येथे होईल. यामुळे करारात असा उल्लेख का?

करारानुसार १५ वर्षे एवढ्या मोठ्या कालावधीसाठी जागा का देण्यात आली?

करारावर ९ जानेवारी २०२३ अशी तारीख आहे; परंतु, प्रत्यक्षात संबंधिताने १६ जानेवारी २०२३ ला कर्करोग रुग्णालयात जागा देण्याची मागणी

हो हो...हे दुकान संबंधितांना मोफत तत्त्वावर देण्यात आले आहे. स्वस्तात औषधी विकण्यासाठी इथे परवानगी देण्यात आली. परंतु, ब्रँडेड औषधे दहा टक्के सवलतीच्या दरात द्यावीत, असा नियम आहे. अशा मेडीकल चालकासाठीच्या फायदेशीर बाबीदेखील करारात झालेल्या आहेत. प्रकरणात मोठे गौडबंगाल असल्याने चौकशी व्हावी.

— प्रवीण शिंदे, अभ्यागत समिती सदस्य

ही चुकीची माहिती होती. मी स्वतः चेक केले. करारनाम्यासह सगळेकाही व्यवस्थित आहे. आपण ‘पीडब्ल्यूडी’कडून ‘मेजरमेंट’ करून भाडे आकारले आहे. आजच भाडे आकारले जाते, असे नाही. जेव्हापासून करार झाला, तेव्हापासून संबंधितांकडून दरमहा भाडे घेतो. त्यासंबंधीच्या दर महिन्याच्या पावत्यादेखील आपल्या ‘रेकॉर्ड’ला आहेत.

— डॉ. संजय राठोड,

अधिष्ठाता, घाटी रुग्णालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत विसर्जन मिरवणुकीत भरधाव कार घुसली, गणपतीच्या ट्रॉलीला धडक देत 4 जणांना उडवलं; घटनास्थळाचा VIDEO

सौंदर्य अन् बुद्धिमत्तेचा संगम! वयाच्या २३व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक करून बनली IFS अधिकारी, कोण आहे तमाली साहा?

Asian Games 2026 : अडखळला, पडला... पण जिद्दीने शर्यत पूर्ण करून भारताचा ४४ वर्षांचा दुष्काळ संपवला! कोण आहे सावन बरवाल?

Satara DJ Dolby Action : पोलिसांची कारवाई चुकीचीच! साताऱ्यात डीजे जप्त झाल्यानंतर उदयनराजेंनी थेट घेतली डॉल्बी चालकांची बाजू; पालकमंत्री देसाईंची भूमिका काय?

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात गणपती विसर्जन मिरवणुकीत सतेज पाटलांनी डीजेच्या तालावर धरला ठेका; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT