छत्रपती संभाजीनगर : छावणी परिषदेचे महापालिकेकडे हस्तांतरण करून घेण्याचा ठराव अखेर मंजूर करण्यात आला आहे. १२१ एकर भाग महापालिकेत समाविष्ट झाल्यास शासनाने या भागाच्या विकासासाठी निधी द्यावा, अशी अट महापालिकेने घेतलेल्या ठरावात टाकण्यात आली आहे.
महापालिकेच्या या ठरावामुळे हस्तांतरणाचा निर्णय लवकरच होण्याची शक्यता व्यक्त आहे. यासंदर्भात नगर विकास विभागाला पत्रही पाठविण्यात आले आहे. छावणी परिषदेअंतर्गत असलेल्या निवासी व व्यावसायिक क्षेत्राशी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांकडे हस्तांतरण करण्याचे धोरण केंद्र शासनाने स्वीकारले आहे.
त्यानुसार गेल्या दोन वर्षांपासून चर्चा सुरू आहे. सुरुवातीला छावणी परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडून अभिप्राय मागवण्यात आले होते. त्यानंतर महापालिकेच्या आयुक्तांकडून अभिप्राय मागवण्यात आले.
हे दोन्हीही अभिप्राय राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाकडे पाठवण्यात आले. छत्रपती संभाजीनगर महापालिकेने छावणी परिषदेचे निवासी आणि व्यावसायिक क्षेत्र महापालिकेत सामावून घेण्याचे ठरवले, तसा प्रस्ताव महापालिकेने शासनाला पाठवला होता.
त्यानंतर छावणी परिषद व महापालिका अधिकाऱ्यांच्या वारंवार बैठका झाल्या. दरम्यान यासंदर्भात महापालिकेने बुधवारी (ता. १३) ठरावही मंजूर केला आहे. त्यात १५ मुद्द्यांची माहिती छावणी परिषद व महापालिकेने सादर केली आहे.
छावणी परिषद महापालिकडे हस्तांतरित झाल्यानंतर या भागाच्या विकासासाठी शासनाने निधी द्यावा, या अटीवर ठराव मंजूर करण्यात येत असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. महापालिका प्रशासनाने राज्य शासनाच्या नगर विकास विभागाला यासंदर्भात पत्र पाठवले आहे.
२०११ च्या जनगणनेनुसार छावणी परिषदेची लोकसंख्या १८ हजार ५१ एवढी आहे. परिषदेचे ३१ कायम कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांना महापालिका सेवेत घेण्याचे ठरावात नमूद करण्यात आले आहे तर कंत्राटी कर्मचारी आवश्यकतेनुसार ठेवण्यात येतील.
छावणीचे एकूण क्षेत्रफळ २,५९० एकर एवढे असून, त्यातील १२१ एकर भाग महापालिकेत समाविष्ट होईल. छावणीने सात मालमत्ता भाडेतत्त्वावर दिलेल्या आहेत. त्यासह १,३६० मालमत्ता महापालिकेकडे वर्ग केल्या जातील.
खाम नदी पात्राचे क्षेत्र व कचरा प्रक्रिया प्रकल्पाची जागा महापालिकेला हसतांतरित करण्याची तयारी छावणीने दाखविली आहे. कर्णपुऱ्याच्या जागेची देखील महापालिकेने मागणी केली होती, पण ही जागा डीईओ कार्यालय पुणे यांच्याकडून एनओसी मिळाल्यानंतर मिळू शकते, असे छावणी परिषदेने महापालिकेला कळविले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.