छत्रपती संभाजीनगर

रोख रक्कम की रेशनचे धान्य? एपीएल शेतकरी कुटुंबांना मिळणार नवा पर्याय

CD
रोख रक्कम की रेशनचे धान्य! एपीएल शेतकरी कुटुंबांना मिळणार नवा पर्याय; तत्काळ करा अर्ज सकाळ वृत्तसेवा धाराशिव, ता.२० : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गत समाविष्ट नसलेल्या एपीएल केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबांना रोख अनुदानाऐवजी थेट धान्य मिळण्याचा नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. विविध कारणांमुळे डीबीटीचा लाभ न मिळालेल्या किंवा रोख रकमेऐवजी प्रत्यक्ष धान्य हवे असलेल्या पात्र लाभार्थ्यांनी प्राधान्य कुटुंब लाभ योजनेत समाविष्ट होण्यासाठी तहसीलदारांकडे अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. शासकीय धोरणानुसार मार्च २०२३ पासून दरमहा १५० रुपये आणि एप्रिल २०२४ पासून प्रतिलाभार्थी १७० रुपये रोख रक्कम खात्यात जमा करण्याची योजना सुरू आहे. जिल्ह्यात या योजनेअंतर्गत ४४ हजार ३९८ पात्र शिधापत्रिकाधारक आणि १ लाख ७८ हजार ६१० लाभार्थी आहेत. त्यापैकी ३० हजार ५ शिधापत्रिकाधारकांना जुलै २०२५ पर्यंत लाभ वितरीत करण्यात आला आहे. मात्र, उर्वरित १४ हजार ३९३ शिधापत्रिकाधारकांना तांत्रिक वा विविध कारणांमुळे लाभ मिळालेला नाही. ..... ((पॉईंटर)) समावेशासाठी ‘हे’ आहेत प्रमुख निकष - कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी ४४ हजार रुपये आणि शहरी भागासाठी ५९ हजार रुपयांच्या आत असावे. - कुटुंब आयकर भरणारे नसावे, कुटुंबाकडे चारचाकी वाहन नसावे आणि कुटुंबातील कोणताही सदस्य शासकीय सेवेत नसावा. ......... ((चौकट)) ...असा करा अर्ज गरजू शेतकरी कुटुंबांनी संबंधित तालुका तहसील कार्यालयाशी संपर्क साधून अर्ज करावा. अर्जासोबत शिधापत्रिकेची प्रत आणि शिधापत्रिकेत नाव असलेल्या सर्व सदस्यांच्या आधार कार्डाची छायांकित प्रत जोडणे अनिवार्य आहे. अन्नधान्यापासून एकही गरजू कुटुंब वंचित राहू नये म्हणून पात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा तत्काळ लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शिवा शर्मा हत्याकांड: लखनऊमधून फरार झालेली श्रद्धा दुबे नागपुरात सापडली; बहीण अन् चालकही अटकेत, ११ दिवस पोलिसांना गुंगारा

Abhijeet Dipke: आंदोलनाबाबत अभिजीत दिपकेंची मोठी घोषणा! आता दिवाळीपर्यंत...

मी अजूनची चांगल्या फॉर्मात आहे, मग भारतीय संघात पुनरागमनाची आशा का सोडू? मोहम्मद शमीचं विधान चर्चेत...

Space War : मोबाईलचे जाळे आणि जीपीएस होणार गुल? अवकाशातील वाढत्या संघर्षामुळे जगासमोर मोठे संकट!

Latest Marathi News Live Update : मुंबईतील ठाकरेंच्या मेळाव्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकावरून शेकडो शिवसैनिक रवाना; राजन विचारे व केदार दिघे यांच्या उपस्थितीने वेधले लक्ष.

SCROLL FOR NEXT