छत्रपती संभाजीनगर

‘सीडीपीओं’ची १७ मंजूर पदे, प्रत्यक्षात चार कार्यरत

CD
‘सीडीपीओं’ची १७ मंजूर पदे, प्रत्यक्षात चार कार्यरत ---- नांदेड, ता. २९ : जिल्ह्यात बालविकास प्रकल्प अधिकारी (सीडीपीओ) यांची १७ पदे मंजूर असताना प्रत्यक्षात केवळ चार अधिकारी कार्यरत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बालविकास प्रकल्पांच्या कामकाजाचा भार मोजक्याच अधिकाऱ्यांवर पडत आहे. एका अधिकाऱ्याकडे तीन ते चार तालुक्यांचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आल्याने प्रशासकीय कामकाज, अंगणवाडी केंद्रांची देखरेख आणि विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीवर ताण निर्माण होत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर रिक्त पदे तातडीने भरण्याची गरज अधोरेखित होत आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीत बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची असते. अंगणवाडी केंद्रांमार्फत सहा वर्षांखालील बालकांना पूरक पोषण आहार, आरोग्य तपासणी, लसीकरणासाठी समन्वय, वाढीचे निरीक्षण तसेच तीन ते सहा वर्षे वयोगटातील बालकांना पूर्वप्राथमिक शिक्षण अशा विविध सेवा पुरविल्या जातात. याशिवाय गर्भवती आणि स्तनदा मातांनाही पोषण व आरोग्यविषयक सेवा दिल्या जातात. या सर्व सेवांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे की नाही, यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी सीडीपीओंची असते. त्यामुळे प्रत्येक बालविकास प्रकल्पासाठी पुरेसे अधिकारी उपलब्ध असणे आवश्यक आहे. ---- आढावा, तपासणी आणि समन्वयावर ताण अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि पर्यवेक्षिकांच्या कामाचा आढावा घेणे, अंगणवाडी केंद्रांना भेटी देणे, लाभार्थींपर्यंत पोषण आहार पोहोचतो की नाही याची तपासणी करणे, कुपोषित बालकांची माहिती घेणे, शासकीय योजनांच्या प्रगतीचा आढावा घेणे आणि आवश्यक अहवाल सादर करणे, अशी विविध कामे सीडीपीओंना करावी लागतात. यासोबतच आरोग्य विभाग, स्थानिक प्रशासन आणि अन्य संबंधित यंत्रणांशी समन्वय साधण्याची जबाबदारीही त्यांच्यावर असते. मात्र, एका अधिकाऱ्याकडे तीन ते चार तालुक्यांचा अतिरिक्त कार्यभार असल्याने सर्व भागांना नियमित भेटी देणे, प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करणे आणि योजनांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीची तपासणी करणे आव्हानात्मक ठरू शकते. प्रशासकीय कामांचा वाढता व्याप आणि तालुक्यांदरम्यान करावा लागणारा प्रवास यामुळे क्षेत्रीय देखरेखीसाठी पुरेसा वेळ मिळण्यावर मर्यादा येण्याची शक्यता आहे. ----- रिक्त पदे भरण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला असून, लवकरच मंजूर पदे भरली जातील, अशी अपेक्षा आहे. -प्रशांत थोरात, बालविकास प्रकल्प अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meenakshi Shinde Resign: माझ्या मनाला प्रचंड वेदना होतायत..., मीनाक्षी शिंदेंनी राजीनाम्याच्या पत्रात नेमकं काय लिहलंय?

School Books: सरकार बदललं अन् शालेय पाठ्यपुस्तकातील 'हे' शब्दही बदलले; पश्चिम बंगालमध्ये मुघल इतिहासाला कात्री

Israel Politics: बहुमत हुकलं तरी नेतान्याहू 'प्रचंड आशावादी'! थेट विरोधकांशीच आघाडीची तयारी

Ranji Trophy 2026: मुंबईने ६४ चेंडूंत जिंकली मॅच!Tanush Kotian च्या ८ विकेट्स, तर Musheer Khan ची ऐतिहासिक कामगिरी

Latest Marathi News Update: आदिवासी महिलेचे चोरी झालेले मंगळसूत्र मिळाले

SCROLL FOR NEXT