Aurangabad Aurangabad
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादच्या मध्यवर्ती बसस्थानकातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

औरंगाबादच्या मध्यवर्ती बसस्थानकावर काही दिवसांपूर्वी शहरात बॅंकींगच्या परिक्षेसाठी अपंग विद्यार्थी आला होता. त्यावेळी एका खासगी ट्रॅव्हल्स एजन्टाने त्याचे अपहरण करुन केवळ ५०० रुपयासाठी त्याचा खून केला

अनिल जमधडे

औरंगाबादच्या मध्यवर्ती बसस्थानकावर काही दिवसांपूर्वी शहरात बॅंकींगच्या परिक्षेसाठी अपंग विद्यार्थी आला होता. त्यावेळी एका खासगी ट्रॅव्हल्स एजन्टाने त्याचे अपहरण करुन केवळ ५०० रुपयासाठी त्याचा खून केला

औरंगाबाद: मध्यवर्ती बसस्थानकातील सुरक्षेसंदर्भात चिंता व्यक्त करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. याचिकेवर न्यायमूर्ती व्ही. के. जाधव व न्यायमूर्ती एस. जी. डिगे यांच्यासमोर प्राथमिक सुनावणी झाली. याचिकेवर पुढील सुनावणी ९ ऑगस्टरोजी ठेवण्यात आली आहे.

औरंगाबादच्या मध्यवर्ती बसस्थानकावर काही दिवसांपूर्वी शहरात बॅंकींगच्या परिक्षेसाठी अपंग विद्यार्थी आला होता. त्यावेळी एका खासगी ट्रॅव्हल्स एजन्टाने त्याचे अपहरण करुन केवळ ५०० रुपयासाठी त्याचा खून केला. या प्रकरणाच्या अनुषंगाने बसस्थानकावर पुरेशी सुरक्षा वाढवण्याची विनंती मुकेश भट्ट यांनी विभाग नियंत्रकांकडे केली होती. मात्र, त्यांनी दखल घेतली नाही, त्यामुळे या विरोधात ॲड. अक्षय लोहाडे व ॲड. संदेश हांगे यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल केली.

त्यांनी राज्यभरातील बसस्थानकांमधे सुरक्षा व्यवस्थेचा अभाव आहे. बसस्थानकांमध्ये अनाधिकृत खाजगी एजन्टांमुळे प्रवाशांना प्रचंड त्रास होतो. अनधिकृत खाजगी ट्रॅव्हल्सचे एजन्ट प्रवाशांना बसमध्ये जाण्यापासून रोखतात, बसस्थानकात सुरक्षा रक्षक किंवा पोलिस दिसत नाहीत. एका सर्व्हेक्षणात ७५ टक्के प्रवाशांना बसस्थानकात सुरक्षीत वाटत नाही. बसस्थानकात स्वच्छ पिण्याचे पाणी नाही, स्वच्छतागृहाची दुरावस्था आहे. कॅन्टीमधील अन्नाची गुणवत्ता नाही. वैद्यकीय सुविधा नाही, डॉक्टर उपलब्ध नसतात आदी मुद्दे उपस्थित करण्यात आले आहे. याचिकेवर ९ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NPS Vatsalya Scheme: पालकांसाठी आनंदाची बातमी! मुलांसाठी खास NPS वात्सल्य योजना; मुलांना मजबूत आर्थिक आधार मिळणार, फायदे काय?

Pankaja Munde : 'कोणी कितीही ओरडले तरी निवडणूक काळात लाडकी बहीण योजना बंद होणार नाही'; मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला विश्वास

Latest Marathi News Live Update : पुण्यात आचारसंहिता भंगावर पोलिसांचा कडक दणका; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त

Ichalkaranji Elections : ‘आपला माणूस’ फॉर्म्युला यशस्वी ठरणार का? अपक्ष उमेदवार ठरू शकतात निर्णायक

Nashik Municipal Election : पॅनलचं जाऊ द्या, माझं बघा! नाशिक मनपा निवडणुकीत 'एक मताचा' छुपा जागर सुरू

SCROLL FOR NEXT