ABD26J81384 (((ओव्हरसेट)))
(((फोटो ओळ))) ः विजेत्या विद्यार्थ्यांसोबत डॉ. वैशाली प्रधान, सी.आर. कुर्मी, डॉ. शिवाजी सूर्यवंशी, डॉ. मसूद हाश्मी, तसेच डॉ. हंसराज डोंगरे, डॉ. सय्यद फिरोज, डॉ. भागचंद सानप, डॉ. मधुर वाकळे, डॉ. संदीप जगताप.
---
देवकरण, आकांक्षा, रितेश, गार्गी, मिहीर प्रथम
---
पीईएसमध्ये सेंट्रल झोन धनुर्विद्या स्पर्धा, चार जिल्ह्यांतील १५० खेळाडूंचा सहभाग
----
सकाळ वृत्तसेवा
छत्रपती संभाजीनगर, ता. १८ ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि पीईएस शारीरिक शिक्षण महाविद्यालय यांच्यातर्फे आंतरमहाविद्यालयीन धनुर्विद्या सेंट्रल झोन (पुरुष आणि महिला) स्पर्धा झाली. यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव जिल्ह्यांतील विविध महाविद्यालयांच्या १५० खेळाडूंनी भाग घेतला. इंडियन राउंड, रिकर्व्ह राउंड आणि कंपाउंड राउंड या प्रकारांत खेळाडूंनी कौशल्याचे प्रदर्शन केले. देवकरण जऱ्हाड, आकांक्षा घाडगे, रितेश देशमुख, गार्गी चव्हाण, मिहीर अपार आणि तेजल साळवे यांनी आपापल्या गटात
प्रथम क्रमांक पटकावला.
छावणी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक डॉ. विवेक जाधव आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. अभिजित वाडेकर यांच्या हस्ते स्पर्धेत उद्घाटन झाले. बक्षीस वितरण मिलिंद महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वैशाली प्रधान आणि धनुर्विद्या प्रशिक्षक सी.आर. कुर्मी यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी पीईएस शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी सूर्यवंशी होते. यावेळी विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे क्रीडा प्रतिनिधी डॉ. मसूद हाश्मी, डॉ. हंसराज डोंगरे, डॉ. सय्यद फिरोज, डॉ. भागचंद सानप, डॉ. मधुर वाकळे, डॉ. संदीप जगताप आणि डॉ. नागरे उपस्थित होते. पंच म्हणून भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे निवृत्त आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या प्रशिक्षक सी.आर. कुर्मी, डॉ. उदय वझरकर, डॉ. हेमंत वर्मा, भीमराज रहाणे, अशोक जंगमी, आशुतोष खिची, हितेश कुर्मी, भावना कोटुले, विशाल नरके, विशाल वाघचौरे, दीपक सुरडकर आणि विक्रम लाहोट यांनी काम पाहिले. स्पर्धेसाठी आयोजन समितीचे सचिव मंगेश डोंगरे, डॉ. जी. सूर्यकांत, डॉ. संतोष कांबळे, डॉ. सय्यद मजहर, डॉ. गौतम गायकवाड, अनिल बागूल, अक्षय दाणे, मुर्तुजा बेग, सुनील शिंदे आणि पंकज सोनवणे यांनी पुढाकार घेतला.
----
स्पर्धेचा निकाल
इंडियन राउंड : पुरुष
- प्रथम : देवकरण जऱ्हाड, जेईएस महाविद्यालय, जालना
- द्वितीय : श्रेयश घट्टे, जेईएस महाविद्यालय, जालना
- तृतीय : साहिल पवार, पीईएस शारीरिक शिक्षण महाविद्यालय
- चतुर्थ : युवराज बोधले, जेईएस महाविद्यालय, जालना
---
इंडियन राउंड : महिला
- प्रथम : आकांक्षा घाडगे, जेईएस महाविद्यालय, जालना
- द्वितीय : कोमल औसारे, एमएसएम शारीरिक शिक्षण महाविद्यालय
- तृतीय : अक्षरा घाटेकर, सिद्धार्थ महाविद्यालय, जाफराबाद
- चतुर्थ : प्रणाली बनसोड, सावता माळी महाविद्यालय, फुलंब्री
---
रिकर्व्ह राउंड : पुरुष
- प्रथम : रितेश देशमुख, पीईएस शारीरिक शिक्षण महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर
- द्वितीय : अंकुश मसने, पीईएस शारीरिक शिक्षण महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर
- तृतीय : कुणाल सखराणी, पीईएस शारीरिक शिक्षण महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर
- चतुर्थ : जय जावळे, केएसके महाविद्यालय, बीड
---
रिकर्व्ह राउंड : महिला
-प्रथम : गार्गी चव्हाण, एसएसपीएम महाविद्यालय, धानोरा
- द्वितीय : सुजाता लोणकर, आसारामजी भांडवलदार महाविद्यालय, देवगाव रंगारी
---
कंपाउंड राउंड : पुरुष
- प्रथम : मिहीर अपार, राजकुंवर महाविद्यालय, धावडा
- द्वितीय : निशांत राठोड, वायसीसी महाविद्यालय, सिल्लोड
- तृतीय : हर्षवर्धन इंगळे, राजकुंवर महाविद्यालय, धावडा
- चतुर्थ : शॉन शिंदे, जेईएस महाविद्यालय, जालना
--
कंपाउंड राउंड : महिला
- प्रथम : तेजल साळवे, अंकुशराव टोपे महाविद्यालय, जालना
- द्वितीय : जागृती तायडे, वायसीसी महाविद्यालय, सिल्लोड
- तृतीय : सानिका मराडे, अंकुशराव टोपे महाविद्यालय, जालना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.