crime
crime esakal
छत्रपती संभाजीनगर

Crime News : चहाच्या घोटाने मंगळसूत्र चोरट्यांना पोचविले कोठडीत

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : देवानगरी भागात मॉर्निंग वॉक करणाऱ्या सेवानिवृत्त शिक्षिकेला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने गळ्यातील ८० हजार रुपयांचे मंगळसूत्र हिसकावणाऱ्या दुचाकीस्वार दोघांना पोलिसांनी अटक केली. विशेष म्हणजे दोघेही सोन्याच्या दुकानात कामही करत होते. या दोघांना १२ मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.

पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये संशयित सुनील अरुण सपकाळ (वय २१, रा. सेलगांव पोस्‍ट, तळगाव ता. जामनेर जि. जळगाव, ह. मु हायकोर्ट कॉलनी, संग्रामनगर सातारा परिसर), रवी ऊर्फ गोलु एकनाथ महाजन (वय २०, रा. पन्‍नासाभनगर, ता. लोधीपुरा जि. बऱ्हाणपूर, मध्‍यप्रदेश ह. मु. हायकोर्ट कॉलनी, संग्रामनगर, सातारा परिसर) या दोघांचा सामावेश आहे. त्यांना मंगळवारी (ता.९) रात्री पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पोलिसांनी आरोपींच्‍या ताब्यातून चोरलेले मंगळसूत्र, दुचाकी आणि दोन मोबाईल असा सुमारे एक लाख ९८ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्‍त केला आहे.

फिर्यादी अलका विलास मोहरील (रा. अवधुत अर्पाटमेंट, देवानगरी) या ५ मे रोजी पहाटे मॉर्निंग वॉकला गेल्या होत्या. जाबींदा बंगल्‍यासमोर पाठमागून एका दुचाकीवर दोनजण आले. त्‍यातील एक जण फिर्यादी जवळ आला व पत्ता विचारण्‍याच्‍या बहाणा करून त्याने फिर्यादीच्‍या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पलायन केले. या प्रकरणात उस्‍मानपुरा ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

अन्् अडकले जाळ्यात

मंगळसूत्र हिसकावल्याच्या घटनेनंतर पोलिसांनी शोध मोहीम सुरु केली. घटना घडल्यानंतर आरोपी कोणत्‍या दिशेने आले व कोणत्‍या दिशेने गेले याच्या शोधासाठी पोलिसांनी शहरातील सीसी‍टीव्‍ही तपासले. त्‍यात एका सीसीटीव्‍ही मध्‍ये आरोपी हे मध्‍यवर्ती बस स्‍थानकावर एका मुलाला सोडण्‍यासाठी गेले होते.

तेथे आरोपींनी एका दुकानावर चहा घेतला, व त्‍याचे पैसे क्युआर कोडव्‍दारे दिल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी चहाच्‍या दुकानवरुन आरोपींच्‍या मोबाइलचे डिटेल्स मिळवले. त्‍यानंतर सायबर व गुन्‍हे शाखेच्या पोलिसांनी दोघा आरोपींना बेड्या ठोकल्या. विशेष म्हणजे दोन्‍ही आरोपी हे एका सोन्‍याच्‍या दुकानात काम करत असल्याचे तपासात उघड झाले आहे.

आरोपींना पोलिस कोठडी

अटक केलेल्या दोघांनाही बुधवारी (ता. दहा) न्‍यायालयात हजर करण्‍यात आले. न्यायालयात सहायक सरकारी वकील जयमाला राठोड यांनी युक्तिवाद केला. सुनावणीनंतर प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी एस. एस. छल्लानी यांनी आरोपींना १२ मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : ‘असली- नकली’चा वाद! नाशिक, कल्याणमधून मोदींची ठाकरेंवर टीका

Nana Patole : मोदींचा मुस्लिम द्वेष पुन्हा दिसला

Pandharpur News : भाविकांना जूनपासून होणार विठूरायाचे पदस्पर्श दर्शन

Team India Coach: फ्लेमिंग बनणार टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक? CSK च्या सीईओकडून आले स्पष्टीकरण

Pune Crime : व्यवसायात भागीदारीसाठी तगादा लावल्याने तरुणाने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT