छत्रपती संभाजीनगर

नोव्हेंबरमध्येच तीव्र पाणीटंचाईचे चटके

CD
चाकूरला नोव्हेंबरमध्येच पाणीटंचाईचे चटके ----- तालुक्यात ४५ गावांत पाणी अधिग्रहण; विहिरी, विंधनविहिरी आणि तलाव कोरडेठाक, जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर प्रशांत शेटे चाकूर, ता. १९ : यंदा पावसाने पाठ फिरवल्याने तालुक्यात दुष्काळाचे भीषण परिणाम आता प्रकर्षाने जाणवू लागले आहेत. तालुक्यात अवघा ३६४ मिलिमीटर पाऊस झाला असून, तो सरासरीच्या केवळ ४५ टक्के आहे. अपुऱ्या पावसामुळे खरीप हंगामातच शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली असताना आता पाणीटंचाईचे संकटही अधिक गडद झाले आहे. नोव्हेंबर महिन्यापासूनच तालुक्यातील अनेक गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. विहिरी, विंधनविहिरी आणि तलाव आटल्याने पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू झाली आहे. सध्या तालुक्यात तब्बल ४५ ठिकाणी पाणी अधिग्रहण करून गावांना पाणीपुरवठा केला जात असून, आणखी अधिग्रहणाचे प्रस्ताव पंचायत समितीकडे येत आहेत. त्यामुळे आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट किती गंभीर होणार, याची चिंता आतापासूनच सतावू लागली आहे. तालुक्यातील काही गावांमध्ये मागील वर्षापासूनच पाणी अधिग्रहणाच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू आहे. यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने भूजलपातळीत मोठी घट झाली आहे. परिणामी, गावातील सार्वजनिक विहिरींसह खासगी विहिरी आणि विंधनविहिरींनीही तळ गाठला आहे. पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था म्हणून प्रशासनाला खासगी जलस्रोतांचे अधिग्रहण करावे लागत आहे. सध्या ४५ ठिकाणी अधिग्रहण सुरू असून, पाणीटंचाईची तीव्रता वाढत असल्याने नव्याने अधिग्रहण करण्याची मागणीही वाढत आहे. नोव्हेंबर महिन्यातच तालुक्यात पाणीटंचाईची ही परिस्थिती निर्माण झाली असल्याने पुढील चार ते पाच महिने अधिक कठीण जाण्याची शक्यता आहे. वाढत्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने संभाव्य टंचाईग्रस्त गावांचे सर्वेक्षण करून पाणीपुरवठ्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. नव्या अधिग्रहण प्रस्तावांवर तातडीने निर्णय घेणे, टँकरची पर्यायी व्यवस्था तयार ठेवणे, उपलब्ध तलावांतील पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करणे आणि जनावरांसाठी पाण्याची स्वतंत्र व्यवस्था करणे गरजेचे आहे. यंदाच्या अल्प पावसाने तालुक्यातील ग्रामीण जीवनाचे गणितच बिघडवले आहे. खरीप हंगामातील नुकसान, पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न अशा तिहेरी संकटात ग्रामीण जनता सापडली आहे. अद्याप हिवाळ्याचे दिवस सुरू असतानाच पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आली आहे. चाकूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या बोथी तलावातील पाणी पातळी खालावली असून नगरपंचायतीने पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन करण्याची मागणी होत आहे. अनेक गावांमध्ये पाण्यासाठी कसरत तालुक्यातील नागेशवाडी, नांदगाव, अजनसोंडा, सेवापूरतांडा, केंद्रेवाडी, आंबेवाडी, आंबुलगा, वडवळ नागनाथ, कडमुळी यांसह तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाईने गंभीर स्वरूप धारण केले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. काही गावांमध्ये अधिग्रहणाच्या माध्यमातून पाणीपुरवठा होत असला, तरी वाढती मागणी आणि उपलब्ध जलसाठ्याची मर्यादा यामुळे पाणीपुरवठ्याचे नियोजन करणे प्रशासनासमोर आव्हान ठरत आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'दादर रेल्वे स्थानकाचं नाव तेच राहणार'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं जाहीर; पण, 'चैत्यभूमी' नावाच्या चर्चेवर म्हणाले...

PM Kisan Yojana Rules : जमीन वडिलांच्या नावावर अन् शेती चार मुलं करतात; मग, चारही भावांना 'पीएम किसान'चे 6,000 मिळणार की 24,000 रुपये? काय सांगतो सरकारी नियम?

'देऊळ बंद' फेम आर्या घारेने बदललं नाव; वडिलांचं नाव अन् आडनावही हटवलं, म्हणाली...

Gondia Murder Case : पतीच्या मैत्रिणीचा काटा काढण्यासाठी पत्नीनेच दिली १३ लाखांची सुपारी! २०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी उलगडला गोंदियातील वर्षा तुरकर हत्याकांडाचा थरार

Marathi News Live Updates : स्वीकृत सदस्य निवडीसाठी अर्ज करण्यास दोन दिवस बाकी

SCROLL FOR NEXT