high cort high cort
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद विद्यापीठाच्या ‘पेट परीक्षा’ प्रक्रियेला आव्हान

यासंदर्भात फेरोज अजीज खान यांच्यातर्फे ॲड. शिरीष कांबळे यांनी खंडपीठात याचिका दाखल केली आहे

सुषेन जाधव

औरंगाबाद: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशपूर्व (पेट) परीक्षेला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात (aurangabad bench) दाखल करण्यात आली आहे. पेट परीक्षेदरम्यान विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसीचे) नियम पाळण्यात आले नसल्याचा मुख्य आक्षेप याचिकेत असून यासंदर्भातील परीक्षाच रद्द करण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली आहे.

यासंदर्भात फेरोज अजीज खान यांच्यातर्फे ॲड. शिरीष कांबळे यांनी खंडपीठात याचिका दाखल केली आहे. याचिकेनुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पीएच.डी प्रवेश पूर्व प्रक्रिया पूर्ण करत असताना विद्यापीठ अनुदान आयोगाचे (युजीसी) चे नियम पाळले नाहीत आणि याचिकाकर्ता हा अपंग प्रवर्गातील असूनही त्यास युजीसीच्या नियमाप्रमाणे ५% गुणाची सवलत पहिल्या पेट प्राप्त गुण ४७.५ असूनगी त्याला दुसरी प्रवेश फेरीच्या परीक्षेसाठी पात्र केले नाही. म्हणून या अगोदरही आव्हान दिले होते.

मात्र तेव्हा उच्च न्यायलायात विद्यापीठाने आम्ही युजीसीचे नियम स्वीकृत केले नाहीत असा बचावाचा पवित्रा घेतला होता. त्यामुळे सदरील याचिका फेटाळण्यात आली होती. तथापि, विद्यापीठाने युजीसी चे नियम स्विकारले असतानाही ऑर्डिनन्स १००१ मध्ये स्पष्ट तरतूद असतानाही ५% गुणांची सवलत आरक्षित प्रवर्गागानुसार दिली नाही म्हणून परत एकदा दुसऱ्या पत्रात फेरी साठी संधी द्यावी म्हणून विद्यापीठाकडे अर्ज केला. सदरील अर्जावर काहीही कार्यवाही केली नाही म्हणून याचिकाकर्ता यांनी युजीसी व ऑर्डिनन्स १००१ चे पालन केलं नाही म्हणून प्रवेश परीक्षा रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT