Chandrakant Khaire esakal
छत्रपती संभाजीनगर

Chandrakant Khaire: मुख्यमंत्र्यांच्या सभेत दम नव्हता; पैसे देऊन गर्दी जमवली

दत्ता लवांडे

औरंगाबाद : सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पैठण येथे मंत्री संदीपान भुमरे यांच्या मतदारसंघात सभा पार पडली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी पैसे देऊन गर्दी जमवल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकाराची एक ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली होती. त्यानंतर कालच्या मुख्यमंत्र्यांच्या सभेत काही दम नव्हता असा टोला शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी माध्यमांशी बोलताना लगावला आहे.

(Chandrakant Khaire On Cm Eknath Shinde)

"कालच्या मुख्यमंत्र्यांच्या सभेत दम नव्हता. या सभेसाठी पैठण मतदारसंघातले लोकं फक्त २५ टक्के होते. बाकीचे लोकं हे फुलंब्री, सिल्लोड, पाथर्डी, शेवगाव अशा ठिकाणाहून आणले होते, हे मी पुराव्याशिवाय बोलत नाही." अशी टीका चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री चंद्रकांत खैरे यांच्यावर केली आहे. मला काल अनेक लोकांचे फोन आले, त्यांना ३०० रूपये आणि ५०० रूपये देऊन सभेसाठी नेण्यात आल्याचा दावा खैरे यांनी यावेळी केला.

दरम्यान, चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यासाठी कोपऱ्यात दोन खुर्च्या टाकायला हव्या होत्या असं वक्तव्य शिंदे गटातील आमदार शहाजी पाटील यांनी केलं होतं. त्यानंतर, "मी मातोश्रीवरून त्यांच्यासाठी यापेक्षा चांगल्या खुर्च्या घेऊन येतो, त्यांनी आमच्याकडे यावं." असं प्रत्युत्तर खैरे यांनी दिलं.

"मुख्यमंत्र्यांच्या पैठण येथील सभेनंतर आम्ही मतदारसंघात जाऊन लोकांना भेटणार आहोत. लोकांशी चर्चा करणार आहोत, आम्ही वातावरण निर्मिती करणार आहोत. मी गेलो की वातावरण निर्मिती होते, कारण मी ओरिजनल आहे ना." असं खैरे म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT