Chandrakant Khaire sakal
छत्रपती संभाजीनगर

दिल्लीतून नामांतर करून आणा, अन्यथा रस्त्यावर उतरू - चंद्रकांत खैरे

महाविकास आघाडी सरकारने औरंगाबादचे नामांतर ‘संभाजीनगर’ करून या प्रस्तावास मंजुरी दिली होती.

सकाळ वृत्तसेवा

महाविकास आघाडी सरकारने औरंगाबादचे नामांतर ‘संभाजीनगर’ करून या प्रस्तावास मंजुरी दिली होती.

औरंगाबाद - महाविकास आघाडी सरकारने औरंगाबादचे नामांतर ‘संभाजीनगर’ करून या प्रस्तावास मंजुरी दिली होती, मात्र शिंदे- फडणवीस सरकारने संभाजीनगर नामांतराला स्थगिती दिली. या संदर्भात शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी यावर जोरदार टिका करत एक महिन्यात शहराच्या नामांतराचा ठराव केंद्रातून मंजूर करून आणा अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरेल, असा इशारा दिला.

शिवसेना नेते खैरे म्हणाले, की यापूर्वी ज्यावेळी शहराच्या नामांतराचा निर्णय झाला त्यावेळी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा ठराव दिल्लीला पाठवू म्हटले होते. मग आता काय झाले? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रेय घेण्यासाठी नामांतराचा निर्णय स्थगित केला आहे.

आता केंद्रातही तुमचेच सरकार आहे. एक महिन्यात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांनी दिल्लीला जाऊन नामांतर करून आणा, असे आव्हान देत महिनाभरात निर्णय झाला नाही तर जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. शिवसेना संपविण्याचा भाजपचा अजेंडा असल्याचा आरोप करीत ही शिवसेना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची असून कधीही संपणार नाही, असे ठणकावले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे म्हणाले, एकीकडे दोन सदस्यीय मंत्रीमंडळ हिंदुत्वासाठी हाकाट्या पिटते आणि दुसरीकडे शहराच्या नामांतराचा निर्णय स्थगित करत आहे. औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर झाले पाहिजे, यासाठी शिवसेना जनतेला सोबत घेऊन रस्त्यावर उतरेल, असा सरकारला इशारा दिला.

आज आंदोलन

नामांतराचा निर्णय स्थगित केल्याच्या निर्णयाविरोधात शिवसेनेच्यावतीने शनिवारी सकाळी १० वाजता हडको टि. व्ही. सेंटर इथे छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात येणार आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येणार असून आंदोलनात सर्व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoffs Scenario: कोलकाताचे आव्हान संपुष्टात? गुजरात टायटन्सकडून दारूण पराभव, Point Table मध्ये मोठा बदल

GT vs KKR Live: शुभमन गिलची वादळी खेळी! विराट कोहलीकडून हिसकावली ऑरेंज कॅप; वैभव सूर्यवंशी टॉप फाईव्हमधून बाहेर गेला

AOR कोण आहेत, ज्यांना AI च्या वापराबाबत सरन्यायाधीशांकडून मिळाला इशारा; म्हणाले, विश्वास महत्त्वाचा!

Pune Police Bharti News: पोलिस भरती वैद्यकीय तपासणीत डमी उमेदवाराचा पर्दाफाश; ससून रुग्णालयातील प्रकारावर तिघींवर गुन्हा

Women Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक पडलं, पण संपलं नाही! आता मंजुरीसाठी सरकार कोणती रणनीती आखणार? ‘हे' ५ पर्याय गेमचेंजर ठरणार

SCROLL FOR NEXT