PM Narendra Modi-Sharad Pawar Meeting |
esakal
नीट पेपरफुटी प्रकरणावरून दिल्लीतील जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन सलग तिसऱ्या दिवशीही सुरू आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या मागणीवर आंदोलक ठाम आहेत. दुसरीकडे, काँग्रेससह विरोधी पक्षांनीही संसदेच्या पावसाळी अधिवेशनात या मुद्द्यावर चर्चा व्हावी, अशी मागणी लावून धरली आहे. अशा वातावरणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतलेली भेट राजकीय चर्चेचा विषय ठरली आहे.