

BCCI New Rules
Sakal
BCCI New Cricket Rules : बीसीसीआयच्या नव्या देशांतर्गत क्रिकेट हंगामाला (Domestic Cricket Season) सुरुवात होत आहे. पुढच्या महिन्यात दुलिप ट्रॉफी खेळली जाईल, यासाठी संघही जाहीर झाले आहेत. पण त्याआधी बीसीसीआयने काही नियमांबाबत मोठे निर्णय घेतले असल्याचे समजत आहे.
हे नियम नव्या २०२६-२७ हंगामापासून लागू होणार असल्याची माहिती मिळाली आहे. यात सामन्यातील शेवटचा डाव सोडून देण्यावर निर्बंध आणि जाणूनबुजून फ्रंट-फूट नो-बॉल टाकणाऱ्या गोलंदाजांवर कठोर कारवाई अशा काही नियमांचा समावेश आहे.