छत्रपती संभाजीनगर

बोगस जनावरे दाखवून चारा डेपो लाटण्याचा डाव?

CD
चारा असतानाही बोगस नोंदी दाखवून ‘चारा डेपो’चा घाट आष्टी, ता. ९ (बातमीदार) : आष्टी, पाटोदा आणि शिरूर तालुक्यांमध्ये जनावरांसाठी मुबलक चारा उपलब्ध असतानाही, केवळ शासकीय अनुदानाचा गैरवापर करण्यासाठी कागदोपत्री बोगस व अस्तित्वात नसलेली जनावरे दाखवून चारा डेपो सुरू करण्याचे मनसुबे रचले जात आहेत. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. चारा छावण्यांऐवजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट अनुदान वर्ग करण्याची मागणी त्यांनी केली. आष्टी तालुक्यात सध्या जनावरांसाठी आवश्यक चारा उपलब्ध आहे. असे असतानाही केवळ राजकीय दबावाखाली महसूल व संबंधित विभागाने प्रत्यक्ष गावात न जाता, बोगस व फुगवलेली जनावरांची संख्या दाखवून चारा डेपो मंजुरीचे प्रस्ताव शासनाकडे पाठवले. शासनाने राज्यातील सर्व पशुधनाचे इअर टॅगिंग करून त्यांची नोंद भारत पशुधन प्रणालीवर अनिवार्य केली आहे. त्यामुळे केवळ कागदोपत्री आकडेवारी दाखवून शासकीय निधीचा अपहार करण्याचे हे षडयंत्र उघडकीस आणण्याची मागणी होत आहे. तसेच रुटी मध्यम प्रकल्पातील पाणी जाणीवपूर्वक नदीपात्रात सोडले आणि वाळू काढण्यासाठी तलाव रिकामा केला. यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली. या कामांची अधिकृत नोंद आष्टी तहसील कार्यालय अथवा पाटबंधारे उपविभागाकडे उपलब्ध नसल्याचा आरोपही राम खाडे यांनी निवेदनातून केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २१ वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, नवव्या मजल्यावरून उडी मारत संपवलं आयुष्य

Pune Crime : मद्याच्या नशेत तरुणीचा विनयभंग करणाऱ्या पोलिस हवालदाराला अटक; हवालदाराला निलंबित करण्याचे दिले आदेश

Bail Pola Water Scarcity : पावसाचा खंड! पोळ्याला बोअरवेलच्या पाण्यावर बैलराजाची खांदेमळणी

Marathi News Live Updates : नागपूर RTO च्या परमिट विभागातील कथित अनियमिततेवरून मनसे आक्रमक

Swimming Competition : १३ वर्षीय विदीची ८१ किमी जलतरणात झेप; देश पातळीवर झालेल्यामुर्शिदाबाद स्पर्धेत द्वितीय क्रमांक

SCROLL FOR NEXT