ranjngau sakal
छत्रपती संभाजीनगर

Chatrapati Sambhaji Nagar : रांजणगावात साकारतेय अयोध्येतील ‘राममंदिर’!

प्रतिकृती उभारणी पूर्णत्वाकडे गणेशभक्तांना दर्शनाची लवकरच संधी

सकाळ वृत्तसेवा

वाळूज महानगर - गणेश उत्सवाचे औचित्य साधून रांजणगाव (शेणपुंजी) येथील श्री संत सावता नवतरुण सार्वजनिक गणेश मंडळाच्यावतीने अयोध्येतील राम मंदिरासारखेच हुबेहूब व भव्य मंदिर उभारले जात आहे‌. येथे पंधरा ते वीस कामगार रात्रंदिवस राबवत असून हे राममंदिर गणेश भक्तांसाठी लवकरच खुले होणार असल्याचे मंडळाच्यावतीने मंगळवारी (ता.१९) सांगण्यात आले.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

गणेश उत्सवानिमित्त संत सावता नवतरुण सार्वजनिक गणेश मंडळ दरवर्षी विविध देखावे साकारून सर्वांना आकर्षित करत असते. यावर्षी येथील मंडळाच्यावतीने अयोध्यातील राम मंदिराची प्रतिकृती साकारली जात आहे. त्याचे काम आता अंतिम टप्प्यात आहे.

संत सावता महाराज मंदिर परिसरातील शंभर बाय तीनशे फूट आकारात हे मंदिर उभारले जात आहे. या मंदिरात प्रभू श्रीराम त्याच बरोबर माता सीता, रामभक्त हनुमान व लक्ष्मण यांच्या मूर्ती विराजमान होणार आहेत. याशिवाय मंदिर परिसरात २८ फुटी रामाची थ्रीडी मूर्ती व शेजारीच रामाला बोरं खाऊ घालताना शबरीमाता साकारली जात आहे.

सुमारे महिनाभरापासून पंधरा ते वीस कामगार या मंदिरासाठी रात्रंदिवस राबत आहे. येत्या २१ तारखेला मान्यवरांच्या हस्ते उद्‍घाटन करून या मंदिराचा देखावा गणेश भक्तांसाठी खुला होणार आहे. जणू काही रांजणगाव (शेणपुंजी) येथे अयोध्याच अवतरली असल्याचा भास या देखाव्यावरून होणार असल्याने हे मंदिर सर्वांचे आकर्षण ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT