Accident News sakal
छत्रपती संभाजीनगर

Chatrapati Sambhaji Nagar : अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण ठार

कागदपत्रे घेऊन येतो म्हणून सोडले होते घर

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर - वाळूज औद्योगिक परिसरात राहिल्यानंतर वडील जटवाडा परिसरात राहण्यास आले. त्यांच्याबरोबर त्यांच्या ३४ वर्षीय मुलाने घरातील सर्व साहित्य जटवाडा येथील नवीन किरायाच्या घरात हलविले, मात्र काही कागदपत्रे किरायाच्या जुन्या खोलीवर राहिल्याने तरुणाने दुचाकीवर वाळूज येथून कागदपत्रे घेऊन आला, मात्र रस्त्यातच त्याला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

या धडकेत गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजेदरम्यान नगर पुणे रस्त्यावरील लक्ष्मीमाता मंदिराजवळ रेल्वे ब्रीजशेजारी घडली. रमेश महादेव शहाणे (३४ रा. कल्याण, सध्या रा. अंबरहिल्स, जटवाडा परिसर) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्याच्या तपास अधिकारी सुनीता दराडे यांनी सांगितले की, मृत रमेश यांचे वडील मागील पाच वर्षांपासून कामगार म्हणून काम करतात. आठवडाभरापूर्वी त्यांनी वाळूज औद्योगिक परिसरातील किरायाचे घर सोडले आणि ते जटवाडा, अंबरहिल भागातील किरायाच्या घरात राहण्यासाठी आले होते.

दरम्यान जुन्या घरी कागदपत्रे राहिल्याने रमेश हा वाळूजला कागदपत्रे आणण्यासाठी गेला होता, परत येताना त्याला रेल्वे ब्रीजजवळ आला असता अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. या धडकेत तो गतप्राण झाला. त्याला घाटीत दाखल करण्यात आले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी छावणी पोलिसांत नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुनीता दराडे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT